Headlines

4 अफेयर्स 3 लग्न, पण एका ब्रेकअपनं बदललं ‘या’ सुपरस्टारचं आयुष्य; ‘प्रेमात होतो तेव्हा तिनं मला…’

[ad_1]

Mithun chakraborty affairs : बॉलिवूड लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे त्यांच्या कामाप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. त्यांचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. त्यात श्रीदेवी, हेलेना न्यूक, सारिका आणि योगिता बाली यांची देखील नावं आहेत. मात्र, एका ब्रेकअपमुळे त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांनी एका कार्यक्रमात खुलासा केला की त्या ब्रेकअपमुळे तो एक दर्जेदार अभिनेता झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या खासगी आयुष्याचं उदाहरण देत ‘सा रे गा मा पा’ च्या स्पर्धकाला म्हणाले की त्यांना या गोष्टीविषयी माहित आहे की ज्या महिलेनं तुला सोडलं आहे, ती एक दिवस नक्कीच तुझ्याकडे येईल आणि तुमच्यात असलेला दुरावा नाहीसा होईल. 

मिथुन चक्रवर्ती यावेळी म्हणाले की ‘प्रत्येक व्यक्ती वाईट काळातून एकदा तरी जातो, पण मी माझ्या अनुभवातून शिकलो की प्रेम करण हा एक वेगळाच आणि सुंदर अनुभव आहे. त्यामुळे त्यात स्वत: ला हरवणं योग्य नाही. मी देखील अशा परिस्थितीचा सामना केला आहे. मी तिच्या प्रेमात बुडालो होतो. तेव्हा तिनं मला अचानक सोडलं. त्या खास क्षणानं माझं आयुष्य बदललं आणि मी एका साधारण स्टारपासून सुपरस्टार झालो. आता मला लोक लिव्हिंग लेजेंड बोलतात.’

मिथुन पुढे म्हणाले की, ‘योगायोगाने ती मुलगी एकदा मला ट्रेनमध्ये भेटली. मला पाहून ती लपली. मी तिच्याकडे गेलो आणि तिला सांगितले की मला सोडून तिनं चांगले केले आहे. माझ्याकडे देण्यासारखे काही नव्हते. मी ना स्थिर होतो ना भविष्य होतं, नाही घर आणि त्यासोबत अन्नधान्याचीही टंचाई होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिनं तिच्या वागण्याबद्दल खेद व्यक्त केला. मी तिला आश्वस्त केलं की तिच्या निर्णयामुळे मी आज जो आहे तसा बनण्यास मला मदत केली. मला विश्वास आहे की आयुष्याचे चक्र पूर्ण झाल्यावर ती तुला भेटेल आणि या सगळ्या कडू भावना दूर होतील. देव ते शक्य करतील.’

हेही वाचा : अनुष्का-विराटचा सोशल मीडियावर रोमान्स, I Love You मेसेज पाहताच क्रिकेटरनं लावला कपाळावर हात

मिथुन चक्रवर्ती यांचं कमल हासन यांची एक्स वाइफ सारिकासोबत अफेअर होतं. त्यांच्यासोबत ते ‘हमारा संसार’ या चित्रपटात दिसले होते. सारिकाशी ब्रेकअप झाल्यानंतर ते मॉडेल आणि लोकप्रिय अभिनेत्री हेलेना न्यूक यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आले होते. त्यानंतर मिथुन यांनी हेलेना यांच्यासी 1979 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या चार महिन्यात ते विभक्त झाले. तर त्यानंतर मिथुन दा नं योगिता बाली यांच्याशी लग्न केलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *