Headlines

30 lakh farmers crop damaged due to heavy rain in maharashtra zws 70

[ad_1]

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा ४२ ते ४५ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. 

राज्यात यंदा सुरुवातीला चांगला मोसमी पाऊस झाल्यामुळे भरघोस पिकांची आशा शेतकऱ्यांना होती. राज्यात यंदा ऊस वगळून १४६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ९४ लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत भाग घेऊन ५८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला.

हेही वाचा >>> Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा

राज्यात जुलै-सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला मोठा फटका बसला असून, पूर, अतिवृष्टीमुळे २३ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. राज्य सरकारने यंदा शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी अतिवृष्टी, पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत चार हजार ६९१ कोटींची मदत जाहीर करण्यात आली असून, या मदतीचे वाटप सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्याने दिली. ज्या ठिकाणी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे, त्याचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला देण्यात आले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी कोसळलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा >>> तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”

अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत ४२ ते ४५ लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. विमा भपाईसाठी ४१.६३ लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्याकडे दावे दाखल केले असून, त्यापैकी ३० लाख ५६ हजार शेतकऱ्यांच्या शेतकपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती कृषी विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. या सर्वेक्षणाच्या आधारे १० लाख ५० हजार शेतकऱ्यांची ८३६ कोटींची भरपाई मंजूर झाली असून, ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत

राज्यात गेल्या आठ-पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यांची उभी पिके नष्ट झाली आहेत त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी जारी केले असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल. आधीच्या अतिवृष्टीच्या घटनांमध्येही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आमच्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पट मदत केली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील अतिवृष्टी, साठलेले पाणी यावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे, याबाबत विचारता फडणवीस म्हणाले, पाऊस किती पडावा, हे महापालिका ठरवत नाही. पुण्यात गेल्या दहा वर्षांत झाला नाही, एवढा पाऊस २४ तासांत पडला. पाण्याचा निचरा करण्यासाठीची ड्रेनेज सिस्टीम तयार करताना एवढय़ा पावसाचा विचार आधी झाला नव्हता. ही यंत्रणा ४० वर्षांपूर्वी तयार झाली होती व भाजपची सत्ता पाच वर्षे आहे, असे त्यांनी सांगितले.

ओला दुष्काळ जाहीर करा

राज्यात सततच्या पावसाने शेतकऱ्यांची खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून अडचणीतील शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर तर जलमय करून टाकले आहे. या जोडीला पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे जनतेला सावध करणे गरजेचे आहे. शिवाय धरणाचे पाणी सोडताना नदीकाठच्या लोकांनाही सतर्क केले पाहिजे. याकरिता सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या पाहिजेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *