Headlines

“२०१९ ला मोदींचा फोटो, फडणवीसांचा चेहरा वापरुन निवडणुका जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला” | Prasad Lad on Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut scsg 91

[ad_1]

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आणि त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले असून आता या मुलाखतीवर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. मात्र आता ही मुलाखत म्हणजे, “बॅट पण माझी, चेंडू पण माझा आणि अंपायर पण माझा,” अशा प्रकारची होती असा टोला भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

प्रसाद लाड यांनी तुमच्याच वृत्तपत्राला तुम्हीच मुलाखत देणं योग्य नसल्याचं माजी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. “बॅट पण माझी, चेंडू पण माझा आणि अंपायर पण माझा याप्रमाणे मुलाखत पण माझी, वृत्तपत्र पण माझं आणि जगप्रसिद्ध संपादक पण माझा. अशाप्रकारे मुलाखती देऊन चालणार नाही उद्धवजी, २०१९ मध्ये पाठीत खंजीर कोणी खुपसला?” असा प्रश्न प्रसाद लाड यांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

तसेच पुढे लाड यांनी, “वेळोवेळी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना मी सांगू इच्छितो की ज्या नरेंद्र मोदींचा फोटो वापरुन, ज्या देवेंद्रजींचा चेहरा वापरुन तुम्ही महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकलात. ज्यांच्या नावाचा आधार घेत या निवडणुकांमध्ये जास्तीत आमदार निवडून आणले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे,” अशीही टीका केली.

नक्की वाचा >> “बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान

“पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा तुम्ही करु नका अख्खा महाराष्ट्र ओळखतोय की पाठीत खंजीर कोणी खुपसला,” असंही लाड यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रकाशित होणार असून आज पहिला भाग प्रकाशित झाला आहे तर उद्या म्हणजेच २७ जुलै रोजी दुसरा भाग प्रकाशित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *