Headlines

1993 mumbai blast convicts Yakub memon grave renovated in bada kabristhan

[ad_1]

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली आहेत. ही जागा बुरीअल वक्फ बोर्डाच्या अख्यत्यारीत येते.

अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक, फडणवीसांच्या निवासस्थानी त्यांच्याभोवती फिरत होती अज्ञात व्यक्ती, मुंबई पोलिसांकडून अटक

भाजपा नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने घडतंय की मुंबई प्रेमातून? असा खोचक सवाल कदम यांनी विचारला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात या कबरीचे सुशोभिकरण करण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी देखील कदम यांनी केला आहे.

फेसबुक लाईव्ह करत रस्त्यावर गोळीबार, १९ वर्षीय तरुणाला पोलिसांकडून बेड्या, अमेरिकेच्या मेम्फिस शहरातील घटना

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *