Headlines

1947 ला स्वातंत्र्य नव्हे भीक मिळाली होती , 2014 साली मिळालेले स्वातंत्र्य – कंगना राणावत चे वादग्रस्त वक्तव्य

दिल्ली – अभिनेत्री कंगना राणावत ने भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही तर भीक मिळाली होती. स्वातंत्र्य 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले असे वादग्रस्त विधान केले आहे.

यापूर्वी अनेक वेळा कंगणा राणावत यांनी वादग्रस्त विधाने केली होती. आता पुन्हा एकदा त्या वादात सापडले आहेत. आम आदमी पक्षाने कंगनाच्या विधानावर देशद्रोह आणि चिथावणीखोर विधानाबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांच्यासह अनेक राजकारणी , सोशल मीडिया वापरकर्ते यांनी बुधवारी सायंकाळी एका कार्यक्रमात केलेल्या कंगना राणावत च्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले की भारतीय दंड संहिता कलम 504 , 505 आणि 124A अंतर्गत कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले की जे लोक पद्म पुरस्कारासाठी पात्र नसतात अशा लोकांना पुरस्कार दिल्यावर काय होते हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. पुढे ते म्हणाले की कंगना राणावत हिने तिच्या वक्तव्याबद्दल संपूर्ण भारतीयांची जाहीर माफी मागावी. तिने आमच्या स्वातंत्र्य चळवळीचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला आहे.

शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी कंगणा यांच्या विधानाची तुलना भाजपच्या एका कार्यकर्तीशी केली , जिने अलीकडेच दावा केला होता की भारताला 99 वर्षाचा लीजवर स्वातंत्र्य मिळाले आहे.

ज्येष्ठ इतिहासकार इरफान हबीब यांनी लिहिली आहे की निर्लज्जपणाची एक सीमा असते..

यापूर्वी ट्विटरने ट्विटरचे नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यास कारणाने अभिनेत्री कंगना चे खाते कायमचे निलंबित केलेले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *