Headlines

“१६ लेडीज बार मी स्वत: तोडलेत; १०० हून अधिक गुन्हे माझ्यावर दाखल” अधिवेशनात एकनाथ शिंदे आक्रमक

[ad_1]

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या भाषाणामध्ये राज्यात घडलेल्या सत्तानाट्यावर भाष्य केले. यावेळी “१६ लेडीज बार मी स्वत: तोडलेत. १०० हून अधिक गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा- …अन् तो प्रसंग सांगताना एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला; विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतरच्या भाषणादरम्यान घडला प्रकार

त्यावेळी ठाण्यात लेडीज बारसा सुळसुळाट होता. प्रचंड प्रमाणात लोकं वेडी झाली होती. पैशाची उधळण सुरु होती. मी पोलिसांकडे याबाबत खूप अर्ज दिले पण काही उपयोग झाला नाही. बायका आम्हाला शिव्या घालायच्या कारण आम्ही काहीच करु शकत नव्हतो. अखेर मी एकट्याने १६ लेडीज बार फोडले. माझ्यावर १०० पेक्षा जास्त पोलीस गुन्हे दाखल झाले आहेत. असंही शिंदे म्हणाले.त्यावेळी मुंबईत मोठं गॅंगवॉर सुरु होतं. माझ्या कारवाईमुळे मी त्यांच्या निशाण्यावर मी होतो. मी याबाबत एकनाथ दिघेंना सांगितलं. दिघेंनी त्यावेळेसच्या ३ ते ४ शेट्टी लोकांना बोलवून घेतलं आणि त्यांना दम दिला आणि माझा विषय तिथचं संपला अशी आठवण एकनाथ शिंदेंनी सांगितली.

हेही वाचा- अधिवेशनात गुलाबराव पाटलांचे आक्रमक भाषण, म्हणाले ‘आम्ही बंड नाही तर…’

तसेच, “मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं की, चिंता करु नका. ज्या दिवशी मला वाटेल, की तुमचं नुकसान होतंय, त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. तुमचं भवितव्य सुरक्षित करुन मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईन. ही छोटी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही ईकडून तिकडे जाण्याची हिंमत करत नाही. हे का झालं? कशासाठी झाल? का केलं? या सर्वांच्या मुळाशी जायला हवं होतं. याचं कारण शोधायला हवं होतं,” असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – “मला मुख्यमंत्री करणार होते,” एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा; अजित पवारांचाही उल्लेख

“गुजरातला जाताना एकही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊया असं मला म्हणाला नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. हा त्यांचा विश्वास आहे. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाहीये. सुनिल प्रभू यांना माहिती आहे की, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु होता. तुम्ही साक्षीदार आहात. शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं की जे होईल ते होऊदे लढून शहीद होऊदे तरी चालेल. पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. बाकीचे वाचतील,” असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *