Headlines

10-12 shiv-sena-mps-present in shivsena-meeting | Loksatta

[ad_1]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीत केवळ १० ते १२ खासदारांचीच उपस्थिती असल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- फडणवीसांकडे तक्रार जाताच किरीट सोमय्यांचा बदलला सूर? उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलं भलतंच उत्तर

राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा

एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवेसेनेत मोठी फूट पडली होती. अखेर अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करुन सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली. आता आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही भाजपाच्या संपर्कात असून बंडखोरी करण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचा- …म्हणून तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचं नाव निश्चित केलं; शरद पवारांचा खुलासा

बैठकीत उपस्थित खासदार
गजानन कीर्तिकर (मुंबई नॉर्थ वेस्ट), अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), विनायक राउत (रत्नागिरी- सिंधुदुर्ग), धैर्यशील माने (हातकणंगले), हेमंत गोडसे (नाशिक), राहुल शेवाले (दक्षिण मध्य मुंबई), श्रीरंग बारणे (पिंपरी चिंचवड) प्रताप जाधव (बुलढाणा), सदशिव लोखंडे (शिर्डी)

बैठकीत गैरहजर खासदार
कलाबेन डेलकर (दादरा-नगर हवेली), राजन विचारे (ठाणे), कृपाल तुमाने (रामटेक), श्रीकांत शिंदे (कल्याण-डोंबिवली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), हेमंत पाटील (हिंगोली), संजय मांडलिक (कोल्हापूर), हेमंत जाधव (परभणी), राजेंद्र गावित (पालघर), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम)

आमदारांनतर आता खासदारही बंडखोरीच्या मार्गावर?

एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवेसेनेत मोठी फूट पडली होती. अखेर अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करुन सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली. आता आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेच्या संपर्कात असून बंडखोरी करण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

शिवसेनेच्या खासदारांचा द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकडे कल

यापूर्वी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र यापूर्वी शिवसेनेने एनडीएशी संबंध तोडून प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी (दोन्ही काँग्रेस नेते) यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. २०१९ मध्ये शिवसेनेने एनडीए सोडले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *