Headlines

हवालदार एकनाथ पार्टे यांचा मुंबई पोलीस आयुक्तांकडून सत्कार

महिलेने भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अनादर केला त्याचे वाईट वाटले. मी स्वत: कायदा रक्षक आहे. माझा पूर्णपणे कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या गुन्ह्याचे तिला जरूर शासन मिळेल. यापुढेही आपले कर्तव्य चोखपणे करत राहणार, असा निर्धार हवलादर एकनाथ पार्टे यांनी केला.

प्रतींनिधी/अमीर आत्तार –कोरोना संकटाचा काळ गेल्या ६-७ महिन्यांपूर्वी आला. संकट कोणतेही असो पोलीस कायम सयंमाने कर्तव्य बजावत असता याचा प्रत्यय हवालदार एकनाथ पार्टे यांच्या रूपात पाहावयास मिळाला. कर्तव्य असताना पार्टे यांच्यावर एका महिलेने हल्ला केला. मात्र त्यांनी आपला सयंम सोडला नाही , मुंबई पोलीस खाते शिस्तीला प्राध्यान देते, हे दाखवून दिली. या सयंमाचे कौतुक करत कुलाबा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त लता धोंडे यांनी  भररस्त्यात हवालदार एकनाथ पार्टे यांचा सत्कार केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही सत्कार केला.

 २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १५ १५ सुमारास काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार एकनाथ पार्टे हे कॉटन एक्सचेंज चौक, सुरती हंटिलसमोर, काळबादेवी या पॉर्इंटवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एक मोटार सायकलस्वार विना हेल्मेट मोटारसायकल चालवत आला. वाहतूक नियमाचे उल्लंघन करत असल्याने पार्टे यांनी विना हेल्मेटची कारवाई करण्यासाठी त्या मोटारसायकलस्वारास थांबविले. त्यावेळी पुरुष मोटार सायकलस्वार व महिला यांनी हवालदार एकनाथ पार्टे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मात्र पार्टे यांनी त्यांना सर व मॅडम असे म्हणत शिस्तीने दंड कारवाईला सामोरे जाण्याची विनंती केली. असे असताना त्या दोघांनी पोलिसाने अपशब्द व शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप केला आणि हवालदार पार्टे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. भररस्त्यात हवालदार एकनाथ पार्टे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे येणाºया जाणाºयांनी व्हिडीओ शूट केले. काही क्षणात सदर व्हिडीओ सोशल मीडियावर वायर झाला. दरम्यान, या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७ नुसार गुन्हा दाखल करून मोहसीन निजामउददीन खान (26) व सादविका रमाकांत तिवारी (वय -30) यांना ताब्यात घेण्यात आले.

 हल्ला झाला तरी हवालदार एकनाथ पार्टे यांनी आपला सयंम कायम ठेवला. शेवटपर्यंत कायद्याचे रक्षक असल्याचे दाखवून दिले. महिलेने हात उगारला मात्र पार्टे शेवटपर्यंत त्यांच्याशी शिस्तीनेच बोलताना व्हिडीओत दिसून आले. या संयमाचे मुंबईतील कुलाबा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त लता धोंडे यांनी कौतुक केजले. भररस्त्यात गाडी थांबवून सहाय्यक पोलीस आयुक्त लता धोंडे यांनी हवालदार एकनाथ पार्टे यांनाही पुष्पगुच्छ व शाल देऊ न त्यांचा सत्कार केला. दरम्यान, मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनीही हवालदार एकनाथ पार्टे यांनी रिवॉर्ड व व प्रमाणपत्र देऊन पार्टे कुटुंबीयांचा सत्कार केला. या प्रसंगी सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरे-पाटील, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस विरेश प्रभू, मुंबई पोलीस प्रवक्ते पोलीस एस. चैतन्य यांच्यासह अन्य अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *