Headlines

स्तंभ सत्याचा

निर्भीड मी आत्मनिर्भर मी
सत्याचा उभा हा स्तंभ मी


संघर्ष लिहितो लेखणीने

संघर्ष करतो जोखिमेने
स्वतःसाठी जगता जगता
समाजासाठी जगतो मी
निर्भीड मी आत्मनिर्भर मी
सत्याचा उभा हा स्तंभ मी


सत्तेचा नेहमी विपक्ष मी

सामान्यांचा नेहमी पक्ष मी
अन्यायाला ही वाचा फोडी
बुलंद जनतेचा आवाज मी
निर्भीड मी आत्मनिर्भर मी
सत्याचा उभा हा स्तंभ मी


भ्रष्टाचाराचा गर्दनकाळ मी

माहितीचा संप्रेरक द्वार मी
चांगले वाईट वृत्त देतो
समाजाचाच एक आरसा मी
निर्भीड मी आत्मनिर्भर मी
सत्याचा उभा हा स्तंभ मी


दुःख लिहितो सुख लिहितो

ठोके मोजीत हृदयाचे बोल लिहितो
अनेकांचा दुश्मन होतो मी
अनेकांचा आधार होतो मी
निर्भीड मी आत्मनिर्भर मी
सत्याचा उभा हा स्तंभ मी


निरपेक्ष एक पत्रकार मी

जागरूक करता समाज मी
सत्य मांडीत सत्य पोहचवितो
तळागाळाचा विश्वास मी
निर्भीड मी आत्मनिर्भर मी
सत्याचा उभा हा स्तंभ मी


साहिल-ऐ-युसूफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *