Headlines

सिनेअभिनेते सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या

प्रतिनिधी – सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांनी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.सुशांतसिंग राजपूत हे मुळचे बिहार चे होते.त्यांनी 2009 मध्ये पवित्र रिश्ता या टीव्ही सिरीयल मधून आपल्या करिअर ची सुरवात केली होती.यानंतर किस देश मे रहता है मेरा दिल, जरा नचके दिखा या टीव्ही शो मधेहीत्यांनी काम केले. 2016 मध्ये आलेल्या एम एस धोनी the untold story या चित्रपटात त्यांनी महेंद्रसिंग धोनी याची मुख्य भूमिका साकारली होती.यानंतर ही पी.के राबता, वेलकम तू न्यूयॉर्क अशा जवळपास 19 चित्रपटात त्यांनी काम केले आहे. करिअर च्या टॉपवर त्याच्या अशा प्रकारच्या अकाली एक्सिस्ट ने बॉलीवूड मधील अनेकाना तसेच चाहत्यांना धक्का बसला आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता सुशांतसिंहराजपूत याच्या मृत्यूची बातमी धक्कादायक आहे .त्याने घेतलेला आत्महत्येचा निर्णय दुर्दैवी आहे. आत्महत्या समस्येवर उपाय असू शकत नाही, सुशांतसिंहच्या अकाली जाण्याने गुणी, लोकप्रिय अभिनेता गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली! – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *