Headlines

सर्व प्रकारच्या शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप करा – रयत क्रांती संघटना

माढा /राजकुमार माने – रयत क्रांती संघटना माढा तालुक्याच्या वतीने माढा तालुक्यातील  सन 2013 पासून ते अद्याप पर्यंत तालुक्यातील अनेक नागरीकांनी नवीन , विभक्त शिधापत्रिका काढलेल्या आहेत.परंतु त्यांना एकदाही धान्य मिळाले नाही सद्या कोरोना प्राधुर्भाव असल्या कारणाने अनेकांना रोजगार उपलब्ध नाहीत . त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यासर्व शिधापत्रिका धारकांना लवकरात लवकर धान्य उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच 2013 नंतर धान्य मिळत होते , परंतु सद्या धान्य देत नाहीत.अशा लोकांना ही धान्य देण्यास टाळाटाळ करत असले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशीही विनंती करण्यात आली.

 सर्व केसरी कार्ड धारकांना 8 रु किलोने प्रतिव्यक्ती 3 किलो गव्हू , 12 रु  किलोने प्रतिव्यक्ती 2 किलो तांदूळ देण्यात येते. परंतु काही दुकानदार मुद्दामून धान्य देत नसल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्या आहेत त्या सर्व दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यात कुर्डुवाडी तील निलेश व्यवहारे व अतुल चव्हाण यांना गेल्या तीन महिन्यापर्यंत धान्य मिळत होते , पण तीन महिन्यापासून तुमचा थंब उमटतं नसल्याचे सांगून  धान्य दिले जात नाही . परंतु कोरोनाच्या काळात शासनाने थंब बंद केलेला आहे.तरी दुकानदार उडवाउडवीची उत्तरे सर्वसामान्य कार्ड धारकांना देत असल्याची सर्वत्र दिसत आहे. याचीही चौकशी करण्याची विनंती रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पंडित साळुंके यांनी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे. रयत चे अध्यक्ष पंडित साळुंके , तालुका अध्यक्ष अमोल केशरे, काशिनाथ चव्हाण, संतोष कोळी, निलेश व्यवहारे, श्रीकृष्ण डूचाळ , अतुल चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *