Headlines

शाल-श्रीफळ नको , वही आणि पेनाने करा सत्कार

लातूर – अधिकाऱ्यांना बुके न देता वह्या किंवा पेन दया. आशयाचे एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.त्या पत्राचे जनतेमधून कौतुक होत आहे. ही घटना आहे लातूर जिल्हयातील देवणी तालुक्याची.

काय आहे पत्र जाणून घ्या सविस्तर

गटविकास अधिकारी पंचायत समिती देऊनी यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक , ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की पंचायत समिती देवणी अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळांना ग्रामपंचायत कार्यालयास जिल्हास्तर , तालुकास्तर अधिकारी यांना भेटीच्या वेळी शाल , श्रीफळ , हार , बुके देऊन सत्कार करू नये. त्याऐवजी एक डझन वह्या किंवा पेन किंवा इतर शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करावा. करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शाळा सुरू होताच गरजू मुलांना आपण दिलेल्या साहित्याचं वाटप करण्यात येईल.

हे पत्र 28 जुलै 2021 रोजी सर्व मुख्याध्यापक , ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या नावे काढण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *