Headlines

वेतन कपात करणार्‍या शासन निर्णय विरोधात 28 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी – आयटक संलग्न सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने 28 ऑगस्ट रोजी वेतन कपात करणार्‍या शासन निर्णया विरूध्द काम बंद अंदोलन होणार आहे. अधिक माहिती अशी की, 28 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतींची वसूली व उत्तपन्नाची अट बंधनकारक केल्यामुळे त्याचप्रमाणे लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध अद्याप चालू असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्यांना वसूलीच्या प्रमाणात 50 टक्के आणि 75 टक्के वेतन मिळणार आहे.  म्हणजे 10 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्राच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने किमान वेतनाचे दर पुर्ननिर्धारित करून ते परिमंडळ 3 मधील कर्मचार्यांना 13085 रूपये मान्य केले असले तरी वरील शासन निर्णयामुळे त्याचा लाभ कर्मचार्यांना मिळणार नाही.  एका हाताने देण्याचे नाटक करायचे तर दुसर्या हाताने हिसकावून घ्यायचे या सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संतप्त झाले आहेत.  म्हणून 28 जूलैचा शासन निर्णय रद्द करून शासनमान्य वेतन 100 टक्के शासनानेच करणे आवश्यक आहे.  या प्रमुख माण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 जूलै रोजी अंदोलन केले होते.  आता पुन्हा याच मागण्यासाठी 28ऑगस्ट रोजी महाराष्ट्रव्यापी संप कामबंद आंदोलन करणार असल्याचे जिल्हा संघटनेचे सचिव काॅम्रेड ए.बी.कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळवले आहे.  
29 ऑगस्ट रोजी मा. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानावर आंदोलन  हे कोरोना महामारीच्या कारणामुळे 14 दिवस मंत्रीमोहदयांना भेटता येत नसल्याने परवानागी नाकारल्याने कोल्हापूर येथील अंदोलन स्थगित करत दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजीचे कामबंद अंदोलन होणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांनी हे अंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन आयटक ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष काॅम्रेड तानाजी ठोंबरे व सचिव काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *