Headlines

राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम

सांगोला – राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे संस्थापक गोविंद विभूते यांच्या वाढदिवसाचे व  पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यलमर मंगेवाडी गावातील स्मशानभूमीत वृक्षरोपण करण्यात आले.यावेळी संस्थेच्या वतीने 25 रोपांची लागवड करण्यात आली.
      मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत संस्थेच्या वतीने मंगेवाडी मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात गावातील 105 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अमित विभूते यांनी दिली.
रक्तदान करताना संस्थेचे संस्थापक गोविंद विभूते

      लॉकडाउन च्या काळात आपली सामाजिक बांधिलकी जपत ,संस्थेच्या वतीने गरजूंना अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले. ह्या किट चे वाटप सांगोला शहरातील इंदिरानगर वसाहत ,चिंचोली रोड सांगोला तसेच मंगेवाडी  गावातील जवळपास 200 कुटूंबाना किटचे वाटप करण्यात आले.
     संस्थेच्या वतीने असे उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो.आपल्या परिसरात काही गरजू लोक असतील तर आम्हाला कळवा.आम्ही त्याना मदत करू असे आवाहन संस्थेचे संस्थापक गोविंद विभूते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *