Headlines

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अर्सनिक अल्बम ३० होमिओपॅथिक या गोळ्याचे वाटप

प्रतिनिधी – 31 मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हुलजंती गावचे सुपुत्र बिरोबा रोडलाईन्स चे मालक उद्योगपती श्री कामानंद हेकडे , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री विकास चोपडे यांच्या वतीने हुलजंती येथे अर्सनिक अल्बम३० ह्या  होमेपेथीक गोळ्या  गावातील लोकांमध्ये वाटण्यात आल्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्या  गोळ्या उपयुक्त आहेत .हुलजंती मध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना ह्या महाभयंकर रोगाला आळ्या घालण्यासाठी गावातील काही तरुण अहोरात्र काम करत असून त्यांच्या सुरक्षेसाठी  ,कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष अमीर आतार निसार अत्तार श्रीकांत सोमुते पोलीस कर्मचारी , ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जामदार तसेच आरोग्य कर्मचारी  काम करीत असून  त्यांच्या मागणीनुसार गावातील लोकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे  यावेळी बिरोबा रोडलाईन चे मालक , उद्योगपती श्री कामानंद हेकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळ विकास चोपडे ग्रामसुरक्षा दल , कोरणा दक्षता समिती सन फाउंडेशन चे अध्यक्ष अमीर अत्तार श्रीकांत सोमु त्ते निसार आतार  संतोष जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *