Headlines

मौजे भालगांव मध्ये आर्सेनिक अल्बम-३० गोळ्याचे वाटप

प्रतिनिधी – आज रोजी मौजे भालगांव, ता.बार्शी याठिकाणी बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय भालगांव यांच्यातर्फे जिल्हा परिषद सदस्य मा.मदन दराडे सर व इतर मान्यवरांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथी गोळ्याचे सोशल डिस्टंसिंग मध्ये गावातील प्रत्येक कुटुंबाला वाटप करण्यात आले.
           जगभरात कोरोनाने विळखा घातला असताना आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथी गोळ्या अतिशय उत्तम ठरत आहेत. आयुष मंत्रालय दिल्ली यांच्या मार्फत आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथी गोळ्या या प्रत्येकाने घेतल्या पाहिजेत असे सांगितले आहे.
        मौजे भालगांव मध्ये ग्रामपंचायत मार्फत कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळोवेळी घेण्यात आलेल्या आहेत. गावातील प्रत्येक माणसांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्याचे वाटप ग्रामपंचायत कार्यालय भालगांव यांनी करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
             यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा.मदन दराडे सर यांनी सांगितले की, आपण गावामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना केल्या आहेत तसेच गावात योग्य त्या फवारण्या केलेल्या आहेत, लोकांनी कोरोना संदर्भात कशी काळजी घ्यावी हेही सांगितले आहे. योग्य काळजी घेतली तर कोरोनाला घाबरण्यासारखे काहीच नाही. गावातील लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्या चांगल्या आहेत. या प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. गावातील लोकांनी सोशल डिस्टंसिंग, वेळोवेळी हात धुणे या गोष्टी करणे आवश्यक आहे.आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथी गोळ्या घरोघरी जाऊन आशावर्कर, अंगणवाडी सेविका या योग्य त्या सुचनेनुसार वाटप करणार आहेत.
            कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद सदस्य मा.मदन दराडे सर, सरपंच भारती दराडे, उपसरपंच मा.सचिन सोनवणे,ग्रा.पं.सदस्य मा.राजेंद्र कराड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.सुनील सानप, श्री.मारुती घुगे सर,  होमिओपॅथी डॉ.ताटे, ग्रामसेवक चौरे भाऊसाहेब, आशावर्कर, अंगणवाडी सेविका तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *