Headlines

मातोश्री “च्या स्मरणार्थ आर्सेनिक अलम्ब 30 चे वाटप


वागेश्वरी सौ. विमलताई वसंतराव माळकर यांच्या स्मरणार्थ गुळपोळी येथे अर्सेनीक अल्बम 30 गोळ्यांचे मोफत वाटप

 प्रतिनिधी -सध्या बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वागेश्वरी सौ. विमलताई माळकर यांचे स्मरणार्थ गुळपोळी ता.बार्शी येथे त्यांचे सुपुत्र ग्रामसेवक श्री. वैभव माळकर यानी गावातील 700 कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपेथी गोळ्यांचे मोफत वाटप केले.
           सदर उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य मा.इंद्रजित चिकणे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. दत्तात्रय माळी (काले), उपसरपंच श्री. परमेश्वर मचाले, गाव तंटामुक्त अध्यक्ष श्री गणेश चिकने, ग्रा.प.सदस्य श्री. शिरीष चिकने, श्री. विजयकुमार नरखडे, तलाठी श्री.रावसाहेब देशमुख ,पोलिस पाटील श्री. बाळकृष्ण पिसे , पत्रकार भैरवनाथ चौधरी , आरोग्यसेवक श्री. सोनुगोपाल , आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, आंगणवाडी कार्यकर्ती उपस्थित होते.
     हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी ग्रा.प कर्मचारी लखन चौधरी, दत्तात्रय चौधरी, मसा चौधरी यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *