Headlines

महाविद्यालय शिक्षकेतरांचे 7 वेतन आयोगासाठी आंदोलन सुरू, शिक्षकेतर कर्मचारी यांची तीव्र नाराजी

बार्शी / प्रतिनिधी – आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुनर्जीवित करून सातवा वेतन आयोगाचा तातडीने लाभ द्या ही मागणी घेऊन 7 वा वेतन आयोग मिळेपर्यंत खिशाला काळी फित लावून निषेध नोंदवण्याचे आंदोलन आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून सुरू करण्यात आले आहे.

हे अंदोलन राज्यभर सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून आंदोलन सोलापूर जिल्ह्यात देखील सुरू आहे. आश्वासित प्रगती योजनेला वित्त विभागाची मंजुर नसल्याचे कारण ते दहा वर्षांपूर्वीचे जीआर रद्द केल्याने कर्मचारी सातवा वेतन आयोग पासून वंचित राहिले आहेत. नव्वद टक्के शिक्षकेतर कर्मचारी सरकारच्या आडमूठे धोरणामूळे 7 व्या वेतन आयोगापासून वंचीत असल्याने याची तिव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पाच दिवसाचा आठवडा व विद्यापीठ कर्मचाऱ्यांना 58 महिन्याचा फरक मिळावा ही देखील मागणी करण्यात आली आहे.

अंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे, प्रवीण मस्तुद, ए.बी.कुलकर्णी, उमेश मदने, आरती रावडे, हनुमंत करमकर, सुधीर सेवकर, अशोक पवार, गणेश कारंजकर, दत्तात्रय पवार, गणेश व्हटकर, प्रज्ञा हेंद्रे, मोहन सुतार आदी शिक्षकेतर बंधू प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *