Headlines

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकचा कामगार धोरण विरोधी निषेध व मागण्या

बार्शी –  कोरोना लाॅक डाउन काळात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्र सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक 22 मे 2020 रोजी देशव्यापी कामगार विरोधी धोरण निषेध दिन पाळत मागण्या मागण्यात आल्या.  यावेळी कार्यत्यांनी आपल्या हातात पोस्टर घेवून मागण्या मागीतल्या.  मा. पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, मा. कामगार मंत्री, मा. कामगार राज्यमंत्री, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मा. जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा यांना मेलव्दारे निवेदण पाठवण्यात आले आहे.

या निवेदणात म्हटले आहे,  केंद्र राज्य सरकारांनी कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचे निर्णय रद्द करावेतण् कामाचे तास पूर्वीप्रमाणेच आठ तास करण्यात यावेत, लॉक डाऊन कालावधीचे वेतन कामगारांना विनाकपात अदा करा, पत्रकारांना 10 हजार रूपये निर्वाह भत्त द्याव सुरक्षा द्या, लॉक डाऊन मुळे अडकलेल्या कामगार व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावीएत्यांना अन्न पाणी व औषध उपचार औषधोपचाराची व्यवस्था करावी, आयकर लागून नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला साडेसात हजार रुपये थेट रोख मदत द्यावी, सर्व गरजूंना रेशन दुकानातून स्वस्त अन्नधान्य व व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, महागाई भत्ता गोठविण्याचा निर्णय रद्द करा, सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी व व्यवस्थेसाठी जी.डी.पी.च्या ५ टक्के खर्च करा, सर्व मजूरांना प्रवास भत्ता दहा हजार रूपये द्या, मनरेगा ताकदीने राबवा, तिची मोडतोड थांबवा, कामाचे दिवस वाढवा, वेळेत वेतन द्या, षहरी भागात रोजगार आणि निवार्याची सोय करा, कोणत्याही अटी शर्ती विना रेशन द्या,ग्रामीण भागातील गरिब लोक व शेतकर्यांच्या समस्या सोडवा, वृध्द, विधवा आणि अपंग यांना पेन्शन द्या दिल्या जाणरर्या रकमेत वाढ करा, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार करा, केंद्र व राज्य कर्मचारी यांचा महागाई भत्ता गोठवलेला परत चालू करा, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोगाचा लाभ द्या या मागण्या करण्यात आल्या आहे.
 
 या निवेदणावर भाकप राज्य कौन्सिय कार्य सदस्य काॅम्रेड तानाजी ठोंबरे, काॅम्रेड ए.बी.कुलकर्णी, काॅम्रेड प्रविण मस्तुद, काॅम्रेड शौकत शेख, काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, काॅम्रेड पवन आहिरे, यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *