Headlines

बार्शी मधील खराब रस्ते व अपूर्ण भुयारी गटारी पूर्ण करण्यासाठी १० डिसेंबर पासून बार्शी नगरपरिषद गेट बाहेर बेमुदत धरणे आंदोलन

मनीष देशपांडे यांचे खुले पत्र 

संविधानाने “अनुच्छेद २१ ” नुसार सर्व भारतातील नागरिक यांना जीवन जगण्याचा अधिकार व सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे तसेच रस्ता हा नुकतेच मान्य केले आहे की हा  मानवाधिकार सुद्धा आहे . हाय कोर्ट व सुप्रीम कोर्ट चे निर्णय सुध्धा आहेत की मूलभूत अधिकार आहे. आपण या अनुच्छेद चे उल्लंघन केले आहे.भारतीय नागरिक या नात्याने बार्शीतील रस्ते लवकरात लवकर व्हावी यासाठी संघटन आणि व्यक्तिगत अनेक वेळा जिल्हाधिकारी आपल्याला, मुख्याधिकारी आपल्याला,उप मुख्याधिकारी आपल्याला, नगराध्यक्ष आपल्याला व नगरविकास मंत्रालय आपल्याला अनेक लेटर व भेटलो आहे. पण माझ्या अनेक पत्र ची दखल घेतली गेली नाही.त्या मुळे मला आपल्याला संविधान प्रति जागे करण्यासाठी व आमचा मानवी हक्क मिळवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सत्याग्रह करणार आहे.संविधान अनुच्छेद १९ नुसार प्रशासन ऐकत नसेल तर प्रत्येक नागरिक ला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तो मानवी हक्क आहे. मला सर्व लेखी हवे असून चर्चा मधून सध्या होत नाही आहे.

जगायचे ते गाव, समाज, देशासाठी आणि मरायचे ते गाव, समाज, देशासाठी हे व्रत घेतलेले असल्याने जनतेच्या हितासाठी हा सर्व प्रयत्न करीत आलो आहे. मग तो माणूस आणि समस्या भारतातील आणि जगातील कुठलीही असो. हे विचार सुद्धा आपल्या भारतामधील थोर युगनायक स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधीजी यांच्या कडून घेतले आहेत आणि शरीरात प्राण असे पर्यंत करीत राहणार आहे. बरेच लोक हार्ट अटॅक आणि इतर रोगाने येऊन मरतात. असे हार्ट अटॅक आणि रोगाने येऊन मरण्यापेक्षा गाव, समाज, राष्ट्रहितासाठी मरण आले तर ते माझे भाग्यच असेल अशी माझी धारणा झालेली आहे.

बार्शी नगरपरिषद यांच्या विरोधात जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय,बार्शी कडून बार्शी मधील खराब रस्ते व अपूर्ण भुयारी गटारी पूर्ण करण्यासाठी तसेच खालील मागण्या साठी मानवी हक्क दिवस १० डिसेंबर २०२०, गुरुवार रोजी सकाळी ११ वाजे पासून बार्शी नगरपरिषद गेट बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सत्याग्रह करणार आहोत. त्याप्रसंगी गाणी,घोषणा,भजन मनोगतांसाठी माईकचा, मंडप, फ्लेक्स, पोम्प्लेट व इतर आवश्यक साहित्याचा वापर करणार आहोत.

खालील प्रमाणे बेमुदत सत्याग्रह आंदोलन च्या मागण्या.

१) कामामध्ये अनियमितता याची चौकशी व्हावी व जबाबदार्यावर कारवाई व्हावी . 

२) मंजूर न झालेले रस्ते त्वरित मंजूर करणे. 

३) पॅच रिपेअर मंजूर झालेले रस्ते आधी रस्ता झाला आहे का चौकशी करणे. 

४) बार्शी रस्ता मुळे मृत्यू झालेले व्यक्ती यांना बार्शी नगरपालिकाने ५ लाख मदत त्वरित द्यावी.   

५) बार्शी रस्ता मुळे अपघातातील व्यक्तीचा दवाखान्यातील खर्च झाला तो खर्च बार्शी नगरपालिकेने त्वरित देण्याबाबत. 

६) अपघातांमध्ये ज्यांना अपंगत्व आले त्यांना बार्शी नगरपालिकेतर्फे ३ लाख मदत त्वरित द्यावी.

७) भुयारी गटारीचे कामाची चौकशी त्वरित होणे 

८) भुयारी गटारी व रस्ते त्वरित पूर्ण करावे.

९) मागितलेली माहिती आणि समितीबाबत निर्णय त्वरित द्यावा.

 संविधान मूलभूत अधिकार अनुच्छेद २१ आणि  मानवाधिकाराचे उल्लंघन होऊन मानवावर होणारे परिणाम …. .

त्यामुळे आरोग्याचे होणारे नुकसान व परिणाम…

1) रस्त्याच्या धुळीमुळे मानवाच्या श्र्वसणावर परिणाम होऊन दम्याचे आजार होत आहे.

2) तसेच धुळीमुळे डोळ्यांवर देखील परिणाम होत आहेत.

3) सतत आरोग्याची तपासणी करून अनेक आर्थिक अडचणी अडचणी येत आहेत.

4) पावसामुळे अनेक अपघात होऊन जीवनावर परिणाम होत आहेत.

तसेच वाहन वर होणारे परिणाम…

१) रस्ते खराब असल्यामुळे वाहने खिळखिळा होत आहेत. 

२) वाहनांची सतत दुरूस्ती करावे लागत असून आर्थिक अडचण येत आहे त्यामुळे मानसिक त्रास तसेच आर्थिक ताण येत आहेत.

अशा आशयाचे खुले पत्र मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील. ,बार्शी नगरपरिषद ,नगराध्यक्ष असिफ तांबोळी बार्शी नगरपरिषद, उप मुख्याधिकारी जय खुडे,बार्शी नगरपरिषद ,जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा,  नगरविकास मंत्रालय मुंबई,यांना जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय,बार्शी समन्वयक व मानवी हक्क आणि कायदा संरक्षणकर्ता,सोलापूर जिल्हासमन्वयक. मनीष रवींद्र देशपांडे यांनी लिहले आहे. 

मनीष रवींद्र देशपांडे -मेल आय डी – [email protected]  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *