Headlines

प्रा. तुकाराम नारायण मस्के यांची जिल्हा युवा समितीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

पंढरपूर / शंकर जमदाडे – अखिल भारतीय वारकरी मंडळ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी जिल्हा अध्यक्ष श्री ह भ प डॉ किरण महाराज बोधले यांच्या शिफारशीनुसार तर जिल्हा उपाध्यक्ष श्री ह भ प अभिमान महाराज पाटील, सह जिल्हा अध्यक्ष श्री ह भ प प्रभाकर दादा वाघचवरे महाराज, श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज हेटकळे यांच्या सूचनेनुसार जिल्हा समिती प्रमुख पदाधिकारी यांच्या नियुक्ती  जाहीर केली आहे.

प्रा.तुकाराम नारायण मस्के  यांच्या  किर्तन रुपी समाज प्रबोधन आणि त्यांच्या या कामाची दखल घेऊन , अखिल भारतीय वारकरी मंडळ यांनी प्राध्यापक तुकाराम नारायण मस्के यांची जिल्हा युवा समितीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली .प्रा.तुकाराम नारायण मस्के  शिक्षक म्हणूनविवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर मध्ये कार्यरत आहेत . त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी कीर्तनकार झाले आणि त्याच बरोबर हे स्वतः एक मोठे वक्ते आहेत. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर जिल्हा समिती कार्यकारणी पुढीलप्रमाणे

 वारकरी शिक्षण समिती 
१)प्रमुख(अध्यक्ष)- श्री ह भ प अंबरूषी (तात्या) महाराज पाटील (बावी , बार्शी)
२) उपप्रमुख (उपाध्यक्ष)- श्री ह भ प हसन महाराज आतार (कुर्डू , माढा)

स्वच्छता व व्यसनमुक्ती समिती- 
१)प्रमुख (अध्यक्ष) – श्री ह भ प धनंजय देशमुख महाराज (अकलूज)

जिल्हा युवा समिती 
१)प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प अनिरुद्ध महाराज निंबाळकर (बिटरगाव वांगी करमाळा)
२) उपप्रमुख (उपाध्यक्ष) – श्री ह भ प प्रा.तुकाराम महाराज मस्के (भोसे करकंब)

 सप्ताह व दिंडी समिती- 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प काकासाहेब महाराज पाटील (दारफळ, उत्तर सोलापूर)

 जिल्हा महिला व बालसंस्कार समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- सौ. स्मिता ताई पाटील (कान्हापुरी, पंढरपूर)

 गोपालन व इतर कार्यक्रम समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प पांडुरंग महाराज चव्हाण (सुस्ते, पंढरपूर)

 सार्वजनिक मंदिर बांधकाम व निधी संकलन समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प भागवत महाराज देवकते (सोलापूर शहर)

 जिल्हा समाजकल्याण समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प विश्वनाथ महाराज बाबर(पुळूज)

जिल्हा आरोग्य समिती 
प्रमुख (अध्यक्ष)- श्री ह भ प डॉ सचिन महाराज गोडसे (कुर्डुवाडी)

या सर्वांचे अभिनंदन व स्वागत जिल्हा मुख्य सचिव श्री ह भ प रंगनाथ महाराज काकडे यांनी केले तर यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष श्री ह भ प राजन महाराज काशीद, प्रसिध्दी प्रमुख श्री ह भ प श्रीनिवास महाराज चव्हाण ,संपर्क प्रमुख श्री ह भ प नवनाथ महाराज झिंझाडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *