Headlines

निवृत न्यायाधीश बी एन देशमुख यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

निवृत न्यायाधीश  बी एन देशमुख 

            महाराष्ट्राचा एक आधारवड कोसळला सर्वपक्षीय नेत्यांचा सुर 

उस्मानाबाद  – उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश , शेतकरी कामगार पक्षाचे नेते, विधान परिषदेचे माजी सदस्य बॅरिस्टर  भाई बी एन देशमुख यांचे दि.29 मे 2020 रोजी दुःखद निधन झाले. काल त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयोजित CPI Osmanabad या फेसबुक पेज वरून सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्रद्धांजली सभेत बोलताना कॉ. भालचंद्र कांगो यांनी महाराष्ट्राचा एक आधारवड  कोसळला असून चळवळीची हानी झाल्याचे नमूद केले. उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद च्या भूमिपुत्रास जिल्हावासीयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.तात्यासाहेब यांच्या सोबत न्यायाधीश असताना केलेले काम त्यांचे घेतलेले सल्ले नेहमी उपयोगी पडल्याचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या न्यायदानातून सुध्दा गरीब कष्टकरी शेतकर्यांचा हिताचेच निर्णय झाले , असल्याचे जेष्ठ विधीज्ञ कॉ. मनोहर टाकसाळ यांनी सांगितले.वेगवेगळ्या खटल्यावरील निकाल सांगताना बि एड आंदोलनातील विद्यार्थी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय तात्यासाहेबांनी केल्याचे प्रा.राम बाहेती यांनी नमूद केले.तात्यासाहेबांच्या कोर्टात काम करणाऱ्या प्रत्येक नव्या वकिलास ते आपलं कोर्ट वाटत होत आणि नवीन बरेचं शिकायला मिळतं होते ,असे मत त्यांच्या समोर वकिली सुरू केलेल्या आणि आता उच्च न्यायालयातील बार असिशियशन च्या अध्यक्षा अॅड सुरेखा महाजन यांनी सांगितले. तात्यासाहेब हे चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याना हक्काचं माणूस वाटायचे असे उद्धव भवळकर यांनी सांगितले .उस्मानाबाद जिल्हा वकील संघाच्या वतीने अध्यक्ष अॅड. राघवेंद्र बोधले यांनी श्रद्धांजली दिली,  तात्यासाहेबांनी वैचारिक बैठकीत वाढलेले आणि शेतकरी कामगार पक्षाचे उस्मानाबाद चे सचिव भाई धनंजय पाटील यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली दिली . कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा सहसचिव कॉ. पंकज चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *