Headlines

देशव्यापी शेती वाचवा संविधान वाचवा दिना निमित्त शेतकरी शेतमजूर कामगारांचे आंबाडी नका भिवंडी येथे केंद्र सरकार विरोधात जाहीर निषेध व निदर्शने

भिवंडी – केंद्र सरकारच्या काळया कृषी कायद्याविरोधात आज २६ जून २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण झाले आहेत तसेच २६ जून १९७५ य्या दिवशी देश्यामध्ये आणीबाणी लावण्यात आली होती. याची आठवण ठेवून व आज २६ जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्य किसान सभा व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने अंबाडी नाका, भिवंडी येथे केंद्र सरकारच्या काळया कृषी कायद्यांचा व कामगार विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करून निदर्शने करण्यात आली.


या निदर्शने कार्यक्रमाचे नेतृत्व किसान सभा ठाणे जिल्हा सचिव कॉ. रमेश जाधव, किसान सभा पालघर जिल्हा अध्यक्ष कॉ. सुनिल पाटील, भिवंडी तालुका युथ फेडरेशन अध्यक्ष कॉ. स्वप्निल भोईर यांनी केले.तसेच या कार्यक्रमात प्रमुख कार्यकर्ते, कॉ. तुकाराम आगिवले, कॉ. रुपेश गायकर, कॉ. संजय थुळे, कॉ. प्रदीप पाटील, कॉ. सरिता पाटील, कॉ. उन्नती काळे, कॉ. साक्षी पाटील, कॉ. शुभांगी पाटील, कॉ. सायली पाटील सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *