Headlines

जातीय अत्याचारा विरोधात SFI ची तीव्र निदर्शने

विराज जगतापची ऑनर किलिंग, अरविंद बनसोडे यांची हत्या व एकाच आदिवासी कुटुंबातील तिघांची हत्या या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करून ते विशेष न्यायालयात चालवा !

 सोलापूर – सोलापूर  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीतर्फ़े  राज्यात वाढत्या जातीय अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला.अशा घटनांच्या निषेधार्थ आणि दोषींवर कडक कारवाई करा. या मागणीसाठी एसएफआयने शुक्रवार १२ जून रोजी राज्यभर निषेध आंदोलन करण्याची हाक दिली .याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर जिल्हा कमिटी च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. मा. जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन ईमेल द्वारे पाठविण्यात आले

 काही आठवड्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मांगवडगाव येथे एकाच आदिवासी कुटुंबातील तिघा जणांना ठार मारण्यात आले. काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात नारखेड येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरविंद बनसोडे यांना जीवे मारले गेले. आणि आता चार दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात पिंपरी येथे विराज जगतापची ऑनर किलिंग झाली. या घटनांचा एसएफआयच्या वतीने तीव्र धिक्कार करत ,  अशा अत्याचाराच्या विरोधात राज्यातील विद्यार्थी व जनतेने एकत्र येऊन लढण्याचे sfi ने आवाहन केले.

 या घटना अत्यंत भयंकर असून पुरोगामी महाराष्ट्राला सतत कलंकित करणाऱ्या आहेत. अशा घटना राज्यात पुन्हा पुन्हा होत आहेत. आतापर्यंत अनेक घटनांची पुनरावृत्ती झालेली आहे. तरी देखील आजवर अशा घटना थांबविण्यात सरकार सपशेल फेल ठरलेले आहे. परंतु या घटनांना पायबंद करणे शक्य आहे. त्यासाठी सरकारने कडक कारवाई आणि अशा घटना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांचे तंतोतंत अंमल केले पाहिजे.

 जातीय अत्याचाराच्या विरोधात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी शुक्रवार १२ जून रोजी एकत्र येऊन एसएफआयच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन केले आहे.

या आंदोलनातून एसएफआयच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या.सदरील सर्व प्रकरणांची कायदेशीर चौकशी
 करून ते विशेष न्यायालयात चालवावेत.कायद्यातील तरतुदी नुसार अत्याचारग्रस्त कुटुंबांना आर्थिक सहाय्य आणि अन्य मदत देण्यात यावी. राज्यात वाढत चाललेल्या जातीय अत्याचाराला आळा घाला. अशा ठिकाणी आवश्यक उपाय योजना राबवा.

यावेळी एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, एसएफआयचे मार्गदर्शक किशोर झेंडेकर, जि.क.सदस्य पूनम गायकवाड, दुर्गादास कनकुंटला, प्रशांत आडम, राहुल गोंदकर, सुप्रिया कडदास, श्रावणी कडदास इ.सह विद्यार्थी सहभागी होते.

          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *