Headlines

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : गूढ गोष्टींबद्दल कुतुहल निर्माण होईल. हातून सत्कर्म घडेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

2. वृषभ : मनाची चंचलता वाढू शकते. पूजा-अर्चा मध्ये मन रमवाल. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा वापर करा. जवळच्या प्रवासाचा योग येईल.

3. मिथुन : स्वत:च्या हिंमतीवर विश्वास ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात वाढ करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाची योग्य पावती मिळेल.

4. कर्क : प्रलंबित कामे सामोरी येतील. भावनात्मक विचार करू नका. चुकीच्या गोष्टींना खत-पाणी घालू नका. दिवस धावपळीत जाईल.

5. सिंह : देणी चुकती करावी लागतील. विद्यार्थ्यांची कामे मार्गी लागतील. पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचा फार ताण घेऊ नका.

कन्या : जोडीदाराचा वरचष्मा राहील. हातातील अधिकाराने कामे पूर्णत्वास जातील. अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागावे.

7. तूळ : जोडीदाराचा वरचष्मा राहील. हातातील अधिकाराने कामे पूर्णत्वास जातील. अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागावे.

8. वृश्चिक : कामाचा मनापासून आनंद घ्याल. सरकारी कामे पुढे सरकतील. तरुण वर्गाकडून नवीन शिकावयास मिळेल.

9. धनु : दृष्टीकोनात बदल करून पहावा. सामाजिक प्रतिष्ठा जपा. शेअर्स मधून लाभ संभवतो. मैदानी खेळाची आवड निर्माण होईल.

10. मकर : पत्नीशी वाद वाढवू नका. मुलांची बाजू जाणून घ्या. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमची प्रगती इतरांच्या नजरेत खुपू शकते.

11. कुंभ : इतरांचा विश्वास कमवावा. भावंडांशी मतभेदाची शक्यता. नवीन संधीकडे बारकाईने लक्ष ठेवा. सासरच्या मंडळींकडून लाभ होईल.

12. मीन : सौम्य शब्दांत मत मांडा. प्रेम-प्रकरणात सबुरीने वागा. राजकीय क्षेत्रातून लाभ संभवतो. अति तिखट पदार्थ खाऊ नका.

9 सप्टेंबर 2020 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *