Headlines

जलसाक्षरता केंद्र यशदा च्या वतीने ऑनलाइन संवाद

प्रतिनिधी – पाण्याचे होणारे बाष्पीभवन हीच आजची सर्वात मोठी समस्या आहे.जलसाक्षरता आणि पीकपाणी नियोजन हा खरं तर कळीचा मुद्दा आहे. यावर खूप विस्ताराने भर देणे आवश्यक आहे. कृषी आणि सिंचन हे नियत विभाग फार योगदान देताना अभावानेच दिसतात. हे पाहता जलदुत आणि जलसेवक यांचे वरील धुरा महत्वाची ठरणार आहे.

शेतातील पिकाला दिलेले आणि साठवूण ठेवलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करणे हीच आजची मोठी समस्या असल्याचे मत  औरंगाबाद विभागचे कृषी उप संचालक उदय देवळांकर यांनी व्यक्त केले.

जलसाक्षरता केंद्र,यशदा-पुणे यांचे वतीने बुधवार दि.13 मे रोजी दुपारी 4 वाजता आयोजित केलेल्या “जलसाक्षरता-संवाद” या विषयावरील ऑनलाइन कार्यशाळेत  मार्गदर्शन करतना उदय देवळांकर बोलत होते. जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे,कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे(यशदा-पूणे),भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ.श्रीनिवास वडगबाळकर,बी.एम.शेटे(वाल्मी औरंगाबाद), तसेच पुणे ,सांगली सातारा  भंडारा गोंदिया अहमदनगर येथील जलप्रेमी व जलदुत सहभागी झाले होते.
     

शेती,पाणी आणि माती  यावर मार्गदर्शन करतांना श्री.देवळांकर पुढे  म्हणाले,
शेती हा केवळ व्यवसाय नसून ती एक जीवन पद्धती आहे. भर उन्हाळ्यात पाणी असेल तरच शेती अक्षय आणि समाज स्थिर राहील.पारंपारिक पीकपद्धतीत झालेला बदल हा जैवविविधता धोक्यात आणणारी बाब आहे.पर ड्रॉप मोर क्रॉप ही संकल्पने कडे आता “मोर मनी पर ड्रॉप” या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे.वर्षभरात आपण शेतीत किती रोजगार निर्माण करू शकतो याचा ही विचार करतांना लेबर युनिट ऑडिट केले पाहिजे.पाण्याचे पृष्ठीय बाष्पीभवन कमी केले पाहिजे. महाराष्ट्र राज्याचा बहुतांश भूभाग कोरडवाहू पीक पद्धतीमध्ये मोडतो.
 कृषी महाविद्यालये,विद्यापीठ आणि शेतकरी यांचा समन्वय आणि संवाद एकत्रीत होणे आवश्यक आहे.कृषी उत्पादकता आणि जलसाक्षरता याचीही सांगड घालण्याचा विचार करावा लागेल.शेताच्या ब शेततळ्याचे बाजूने झाडांचे कुंपण केले तर बाष्पीभवन कमी करण्यास मदत होते.

नरेगाचे अभ्यासक डॉ.अमोल वाघमारे हे शाश्वत ग्रामविकास,रोजगाराची हमी आणि स्थळांतरावर उपाय या विषयावर बोलतांना म्हणाले,नरेगाची कामे करतांना काही नकारात्मक अनुभव पुढे येतील,अडचणी येतील परंतु नाउमेद न होता त्यातून मार्ग काढत पुढे गेले पाहिजे.नरेगाच्या माध्यमातून गावतळ्यांचे पुनर्जीवन करता येते,जलसंधानाची कामे करता येतात.सार्वजिनक पाण्याच्या विहिरी ,वृक्ष लागवड,शेत-पाणंद रस्ते यासारखी कामे हाती घेऊन रोजगार उपलब्ध करून देता येतो.
         यशदाचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे यांनी सर्व सहभागी जलनायक,जलयोद्धा,जलप्रेमी जलदूत जलकर्मी याना आवाहन केले की जलसाक्षरतेचा विचार करताना माती,पाणी,भूगर्भ,जैवविविधता, याचा समग्र पणे विचार करावा। आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा गावाच्या जलनियोजनात योगदान द्यावे असे आवाहन केले.

One thought on “जलसाक्षरता केंद्र यशदा च्या वतीने ऑनलाइन संवाद

  1. माननीय पुसावळे सर व डॉक्टर पांडे सर यांनी यशदा जलसाक्षरता ऑनलाईन कार्यशाळा घेतली त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार आणि या कार्यशाळेसाठी उदय देवळाणकर सर डॉक्टर वाघमारे सर तसेच भूजल तज्ञ माननीय वडकबाळ कर सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले बाष्पीभवन रोखणे ही काळाची गरज असून शेततळी आणि शेती बांधावर शेर वनस्पती लावल्यास बाष्पीभवन व हवे पासून संरक्षण होते तसेच नरेगाच्या माध्यमातून शेती कामे वृक्ष लागवड पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण आणि भूजलाचे स्त्रोत बळकटीकरण भूजल व भुगर्भा चा अभ्यास वगैरे माहिती मिळाली त्याबद्दल या मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार अशा कार्यशाळेमध्ये भूजल संबंधित अधिकारी कृषी विभाग तहसील विभाग पंचायत समिती पाटबंधारे विभाग इत्यादी अधिकाऱ्यांचा समावेश असावा असे वाटते पुन्हा सर्वांचे आभार मी हनुमंत कादे जल प्रेमी सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *