Headlines

चेक पोस्ट वरील पोलिसांसाठी तात्पुरत्या निवार्‍याची सोय करण्यात यावी

प्रतिंनिधी- सध्या सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. सध्या पावसाळयाचे दिवस सुरू आहेत. पोलिस कर्मचारी शहराच्या चहुबाजुने सुरू असलेल्या नाकाबंदी वर आपले कर्तव्य बजावत आहेत.नाकाबंदीच्या ठिकाणी सध्या मंडपाच्या स्वरुपात निवार्‍याची सोय आहे. मात्र सध्या पावसाचे दिवस असून कर्मचार्‍यांना पावसात भिजावे लागत आहे.पावसापासून सरक्षण म्हणून तातपुरत्या निवारा कक्ष किवा कंटेनर बॉक्स ठेऊन निवार्‍याची सोय करण्यात यावी.अशी मागणी शहर उत्तर विधानसभा युवक कांग्रेस सरचिटणीस शरद घुमटे यांनी पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडे  केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *