Headlines

कोरोना पॉझिटिव्ह दोन चिमुकल्यांचा डॉक्टरांनी केला वाढदिवस साजरा

सोलापूर दि. 14: कोरोना विषाणूने बाधित झालेल्या दोन मुलांचा वाढदिवस आज सिव्हिल हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला. यामध्ये एका एक वर्षीय मुलीचा तर दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. 
रुग्णालय, त्यामध्ये कोरोना म्हटलं की तणावाचे वातावरण  दिसून येते. मात्र गुरुवारी सकाळी सिव्हिल रुग्णालयामध्ये वेगळेच वातावरण होते. एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्यांचे नातेवाईक तिला भेटण्यास रुग्णालयात आले होते. मात्र डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी तिचा वाढदिवस साजरा केला.  
यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी औदुंबर मस्के त्याचबरोबर इतर त्यांचे सहकारी नर्स, डॉक्टर यांनी केक आणून या रुग्णांना सकारात्मक ऊर्जा मिळवून दिली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डॉक्टर नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे याबद्दल कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *