Headlines

कोरोना नाही म्हणून मारला बोकडाच्या कार्यक्रमावर ताव, अन् स्वतःहून चुपचाप झाले क्वारंटाईन

मंगळवेढा येथील “खास” पाहुण्यांची मेजवानी आली अंगलट

पंढरपूर / नामदेव लकडे – तालुक्यातील भीमा नदी काठच्या गावात एका कुटुंबाकडे बोकडाच्या जेवणाचे आयोजित केले होते.  पाहुण्यांनी मस्त पैकी बोकडाच्या जेवणावर  ताव मारला. पण यात आलेले तीन पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यावर अनेकांची पाचर धाब्यावर बसली. अनेकांनी आता स्वत: क्वारंटाइन केले आहे.

शुक्रवारी एका कुटुंबाच्या घरी बोकडाच्या जेवणाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गावातील लोकांच्या बरोबरच मंगळवेढा येथून तीन जण खास पाहुणे आले होते. जेवणासाठी शंभराच्या आसपास लोकांनी उत्साहाने हजेरी लावली. उपस्थित मंडळी बोकडा खाऊन तृप्त होऊन आपआपल्या घरी गेली.
दुसऱ्या दिवशी (शनिवारी)  मंगळवेढा येथून जेवणासाठी आलेले तीन पाहुण्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची चर्चा सुरू झाली. एकाकडून दुसऱ्याला करत करत जेवणासाठी आलेल्या सर्वांना ही माहिती मिळाली आणि सगळ्यांच्या मनात धडकी भरली. तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणून मग जेवणासाठी आलेल्या सगळ्यांनीच घरा बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.
आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या या गावात बोकडाच्या जेवणामुळे संबंधितांच्या संसर्गामुळे जेवणासाठी गेलेल्या लोकांना लागण झाली तर नसेल ना या भितीने गावकरी चिंतेत आहेत.’बोकडाचे जेवणासाठी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आमच्याही कानावर आली आहे. या विषयी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांच्याशी बोलणे झाले असून ते चौकशी करत आहेत.  या पुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
‘तालुक्यात रुग्ण वाढत असल्याने यापुढच्या काळात अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे’, अशी माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *