Headlines

कॉ.नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

सोलापूर/शाम आडम – सोलापूर जिल्यातील  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापकीय सदस्य स्वातंत्र्य सैनिक कॉ नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉ नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीने कॉ गोदूताई परुळेकर वसाहत कुंभारी येथे गुरुवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले.याचे उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कॉ. विल्यम ससाणे म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे 26 जुलै रोजी कॉ.नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदानाचे शिबाराचे आयोजन करण्यात येते. यंदा कोविड मुळे 5 ऑगस्ट घेण्यात आले. सध्या शहरात प्लाझ्मा व अन्य  रक्ताचा गटाचा तुटवडा निर्माण होत असून सर्व रक्तदाते पुढाकार घेऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन केले. 
यावेळी  सिद्धेश्वर ब्लड बँक मल्लू (बाबा) म्हेत्रे, अश्विनी ब्लड बँक नागार्जुन जिंकले, नगरसेविका कामिनी आडम, कुरमय्या म्हेत्रे,माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, अशोक बल्ला, फातिमा बेग, शकुंतला पानिभाते, रफिक शेख, विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी, दीपक निकंबे, वसीम मुल्ला, बापू साबळे, अप्पाशा चांगले, हसन शेख,वसीम देशमुख, सनातन म्हेत्रे, विजय हरसुरे,  प्रभाकर गेंट्याल, शफी शेख, दत्ता चव्हाण, अनिल वासम, मल्लेशम कारमपुरी,शामसुंदर आडम, राजेंद्र गेंट्याल, आदी सह रक्तदाते उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *