Headlines

ऐंशी वर्षाच्या सामाजिक संघर्षाची धगधगती मशाल: कॉम्रेड तानाजी ठोंबरे

कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे

बार्शी – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी ही शाहिद कॉम्रेड अमर शेखांची, कर्मयोगींची, साहित्यिक, ज्ञानी व कलासंपन्न व्यक्तींच्या स्पर्शाने समृद्ध झाली आहे . त्याच मातीतून लढवय्या कॉम्रेड तानाजी ठोंबरे येथे जन्मून त्या समृद्धीची शान वाढवली आहे.  संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी घालवणाऱ्या कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात 10 जून 1940मध्ये झाला.  मार्क्सवादावर निष्ठा ठेवत श्रमिकांसाठी संपूर्ण हयात व्यथीत करणाऱ्या या कॉम्रेड ला 10 जून 2020  रोजी 80 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा लेखप्रपंच.
          
त्यांचे माध्यमिक शिक्षण सुलाखे हायस्कूल या तर  महाविद्यालयीन शिक्षण म्हणजेच बी.ए: बी.एड् सोलापुरातील दयानंद  महाविद्यालयातून पूर्ण करून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बाशी या संस्थेच्या भवानीनगर साखर कारखाना प्रशालेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून चार वर्षे नोकरी केली. पुढे बहिस्थ विद्यार्थी म्हणून एम.ए. पूर्ण करून व दयानंद महाविद्यालयातून एम.एड् पदवी घेतली. त्यानंतर पाच वर्षे बारामतीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, पानधरे येथे मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मुळातच  आपल्याजवळ जे काही आहे ते तन-मनाने देण्याची वृत्ती असल्याने त्यांनी आयुष्यभर म्हणजे १९७३ ते २००० सालापर्यंत श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शी येथे मराठीचा व्याख्याता व विभागप्रमुख म्हणून ज्ञानार्जन केले.

वाचनाची आवड असल्याने मार्क्सवादी साहित्य त्यांच्या हाती लागले. त्या साहित्याच्या प्रेरणेतून त्यांनी १९७८ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व स्वीकारले. हरहुन्नरी, भाषणात तरबेज व तडफदार अशा हुशार तरुणाकडे पक्षाने ए.आय.एस.एफ. या विद्यार्थी संघटनेच्या कामाची जबाबदारी सोपवली. आपल्या कार्यकर्तृत्वाने अल्पावधीतच सोलापूर जिल्ह्यात या विद्यार्थी संघटनेची उभारणी सरांनी केली. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये नवजवान सभेच्या शाखा उघडून मातीशी असलेली नाळ त्यांनी जोडून ठेवली. कष्टकऱ्यांवरील  अन्यायाविरोधात विडी कामगार संघटनेची आपल्या सहकार्याच्या साधीने बांधणी केली. कामगारांना तडतोड  हजार विडी बांधण्यामागे फक्त चार रुपये देणाऱ्या कारखानदारांच्या विरोधात आवाज उठवत तीव्र आंदोलनाने  रोजगार वाढवून देण्याचे काम केले.

स्वतः च्या कुटुंबापेक्षा कष्टकऱ्यांना महत्त्व देणारे सर दुष्काळ पडलेला असताना शांत बसणे शक्य नव्हते. त्यांनी युथ फेडरेशन म्हणजेच नौजवान सभेच्या गावोगावच्या शाखांतून दुष्काळग्रस्त  भागाचे प्रश्न, विद्याथ्यांचे प्रश्न,  अन्नधान्याचे प्रश्न अशा प्रश्नांवर  जोरदार लढा दिला व त्यातून नौजवान  सभेचे नाव सर्वत्र परिचित झाले. गरीब, कष्टकरी वर्ग संघटित होऊन हक्काचे  भांडण करण्यासाठी शहाणा करण्याचे काम सर करतानाच दुसऱ्या बाजूला प्रस्थापित राजकारणी या संघटनांचे मोडतोड करण्याचे डावपेच करू लागले.  याच काळात पक्षाने ए.आय.एस.एफ.  युध फेडरेशन या संघटनेच्या राज्यपदाची जबाबदारी स्वीकारून सरांनी महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना लढ्याचे शिक्षण दिले. १९८५ च्या पुढे राज्यभर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघटनेच्या सहकाऱ्यांच्या साह्याने आंदोलने उभी केली. या आंदोलनाचा भाग म्हणून १९८५ मध्ये नागपूर येथे ४० हजार विद्याथ्यांचा मोर्चा उभा केला. खाजगीकरणामुळे आजच्या गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण महाग झाले आहे. याची जाणीव असल्याने १९८५ सालीच ए.आय.एस.एफ. ने विनाअनुदानित महाविद्यालयाच्या विसाध्यांची राज्यभार अंदोलने उभी केली व  त्यात सक्रिय सहभाग नोंदवून 25वर्षाखालील खाजगीकरणाच्या विरोधात आवाज उठवला होता. 

त्याच काळात पुरोगामी विचाराच्या जोडीने युवा हक्क समितीच्या नेतृत्वखाली मुंबईत प्रचंड मोर्चा काढला.  विद्यार्थी व शेतकर्यांच्या अंदोलनामूळे 1985 मध्ये ए.आय.एस.एफ. च्या कार्यत्यांबरोबर दहा दिवसांचा तुरूंगवास भोगून विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासाच्या बाहेरचे जग अभ्यासण्यास सांगितले.  तुरूंगात जाउन निराश न होता विविध गुन्हांत जेरबंद असणार्या कैद्यांना व सहाकर्यांना तुरूंगातच कॉ. शहिद भगतसिंग शहिददिन साजरा केला.  या व्याख्यानाचा त्या कैद्यांवर इतका प्रभाव पडला की, भगसिंगांचे विचार कोणी आधीच सांगितले असते तर आम्ही येथे गुन्हे करून आलोच नसतो तर तुमच्याबरोबर गरिबांच्या हितासाठीच्या आंदोलनातून तुरूंगात आलो असतो, असे ते उद्गार तेथील कैद्यांनी काढले. 

1987 च्या सुमारास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने कष्टकरी राज्यचा म्हणजेच रशियचा अभ्यास दौरा केला.  मॉस्को अभ्यासून आल्यानंतर कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा सचिव पादाची जबाबदार पक्षाने दिल्यानंतर 1988 च्या सुमारास पुन्हा शेतकरी अंदोलनातून 10 दिवसांचा कारावास भोगावा लागला.

सर्व कष्टकर्यांची मोट बांधयची हा उद्देश डोळ्यासमोर असल्याने त्यांनी प्राध्यापांची संघटना बांधली व शिवाजी विद्यापीठ टिचर्स असो चे अध्यक्ष म्हणून तसेच सिनीट सदस्य, विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे दहा वर्षे   देखील काम पाहिले.

1985 ते 1990 पर्यंत बार्शी नगरपालीका विरोधी आघाडीचे सदस्य म्हणून नागरी प्रश्नांना हात घातला.  1990मध्ये नव्या आर्थिक धोरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील लढ्याचे नेतृत्व करत अमरावती येथील नवोदय विद्यायलया विरोध दर्शविला.  पुढे बार्शी तालूक्यातील श्रीपतपिंपरी येथील शेतकरी लढ्यात पुन्हा 10दिवसांचा कारावास भोगावा लागला.

2006 साली सोलापूर शहरात झालेल्या विद्रोही साहित्य संमेलान संयोजन समितीचे धडाकेबाज अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले एक रूपया व मुठभर धान्य ऐवढ्याच देणगीवर प्रस्तापितांचे साहित्य संमेलन ओस पाडून दलित, श्रमिकांचे विद्रोही साहित्य संमेलनाच उंचीच्या सर्वोच्च टोकावर नेहणारे कलंदर अशी त्यांची ओळख सोलापूर सांगतात. नामांतराच्या चळवळीत शिक्षा भाेगल्यानंतरही त्यांनी रमाबाई हत्याकांडाचा कडाडून विरोध केला.  त्या बाबत रमाबाई नगरमध्ये त्यांनी व्याख्याने  हि दिले.

154 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाच्या कार्याध्यक्ष पदाचा मान त्यांना  मिळाला, कॅ. ग.मा. सरदार, प्रा. नरहर कुरूंदकर, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. केशन मेशराम यांच्या सोबत त्यंानी काम केले.

2015 मध्ये झालेल्या आठव्या कॉम्रेड अण्णाभाउ साठे साहित्य संमेलान संयोजन समितीचे ते कार्याध्क्ष त्यांनी काम पाहिले.  गोविंद पानसरे यांच्या जाण्यानंतरचे हे बार्शीत होणारे साहित्य संमेलन त्यांनी अजरामर करून टाकले.

व्यंकय्या मडूर, चिंतामणी इंदापूरे, नारायण म्हैसूर या लढवय्या कॉम्रेड सोबतही त्यांनी काम केले.  कॉम्रेड गोविंद पानसरे अण्णासोबत काम केलेले  प्राध्यापकी पेशा असतानाही मार्क्सवादी जीवन जगण्याची रित सिव्कारल्याने कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी आजतागायत 80 व्यावर्षी देखील आयटक संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायम कर्मचारी महासंघाचे, लाल बावटा जनरल कामगार युनियन, डॉ. जगदाळे मामा हॉस्पीटल श्रमिक संघ, बार्शी नगरपालीका कंत्राटी सफाई कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, हॉकर्स युनियन, बांधकाम कामगार, सोलापूर विद्यापीठ  संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना या संघटनाचे अध्यक्ष म्हणून  तसेच आयटक चे उपाध्यक्ष, कम्युनिस्ट पक्षाचे सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून ते उत्साहाने काम पाहतात व अंदोलने बैठकात तरूणाला लाजवेल असा उत्साह कायम ठेवन असतात.  शेतकरी शेतमजूरांची संघटना करून देखील ते श्रमिकांना न्याय मिळवून देत आहेत.  ते अनिसचे जिल्हाअध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत, या सर्व कामात खंबीरपणे साथ मिळाली ती त्यंच्या पत्नी लता ठोंबरे यांनी. त्यांच्या मूलींवर व नातीं व जावयांवर देखील ते काम करीत असलेल्या डाव्या विचारांचा प्रभाव आहे हे विषेश.    

साहित्याचे अभ्यासक म्हूणन ते वावरत रहिले सोबत सर्व सामान्य कार्यकर्त्यांन साठी त्यांनी नवे शैक्षणिक धोरण मुठभरांची मिरादारी, महत्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण, विठ्ठल रामजी शिंदे यांची सामाजीक चळवळ, गोपाळ गणेश आगरक, गिरणगावची बुलंद तोफ गुलाबराव गणाचार्य, जनतेचा महान कलावंत शाहिर अमर शेख, भाई ए.बी.बर्धन व प्रकाशनाच्या वाटेवर असणारी डॉ आंबेडकर व कामगार चळवळ, अण्णा भाउ साठे ही त्यांची साहित्य संपदा देखील निर्माण केली.

निर्मळ चारित्र, कणखर कर्तत्व, अविचल निष्ठा, आचारात व विचारात नसणारी तफावत, चतुरस्र व्यक्तिमतव, इतिहासाचे अभ्यासक, मार्क्सवादा जीवन पध्दती, श्रमिकांचे हितैषी, सामान्य कार्यकर्त्यांमध्ये रमणारे व्यक्तीत्व, सच्चे दिलदार कम्युनिस्ट अशा त्यांच्या विविध पैलूं चा प्रभाव न पडावा तरच नवल.



                                                                                   लेखक – प्रविण मस्तुदबार्शी  
                                                                                   [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *