Headlines

एम.आर.जगदाळे यांची वैराग ग्रामपंचायत ला बदली

बार्शी- वैराग ग्रामपंचायत येथिल ग्रामविकास अधिकारी श्री ए. पी.बारसकर यांना कार्यालयात मद्य प्राशनकरून करून कर्तव्य आणि जबाबदारी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे  निलंबित करण्यात आले आहे.कोरोना विषाणू चा संसर्गामुळे वैराग ग्रामपंचायत क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याने पुढील आदेश येईपर्यत वैराग ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी एम आर जगदाळे यांच्याकडे वैराग ग्रामपंचायत चा पदभार देण्यात येत असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी काढलेल्या बदली आदेशात म्हटले आहे.श्री.जगदाळे यांच्याकडे सध्या उपळाई (ठो) या ग्रामपंचायत चा पदभार असून तो पदभार कोरफळे ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी ए एल काटे यांच्याकडे सोपवला आहे.श्री जगदाळे हे बार्शी तालुक्यातील कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांमध्ये गणले जातात.

       श्री जगदाळे यांच्याकडे सत्ताधारी , विरोधक तसेच सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन दुष्काळ निवारणासाठी केलेल्या कामाचा अनुभव आहे.ह्या व त्याच्या प्रशासकीय कारकिर्दीतील अनुभवाचा वैरागकरांना नक्की फायदा होईल.वैराग ला कोरोना मुक्त करण्यासाठी श्री जगदाळे यांची भूमिका महत्त्वाची राहील.अस सर्वसामान्य नागरिकांना वाटतं.

One thought on “एम.आर.जगदाळे यांची वैराग ग्रामपंचायत ला बदली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *