Headlines

WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन; फायनल गाठण्याचं संपूर्ण गणित फिस्कटलं

[ad_1]

World Test Championship Point Table: टीम इंडियाने (Team India) टी-20 सिरीजमध्ये श्रीलंकेला (IND vs SL) 2-1 ने मात दिली असून आता वनडे सिरीजची (ODI series) तयारी सुरु आहे. अशातच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यामध्ये टेस्ट सामना ड्रॉ झाला. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) फायनलसाठीच्या रेसमध्ये आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ड्रॉ झालेल्या सामन्यामुळे टीम इंडियाला फायनल गाठण्यासाठी अडथळे येऊ शकतात का, हे पाहूया. यासाठी पॉईंट्स टेबलचं गणित समजून घेणं महत्त्वाचं आहे. 

सिडनीमध्ये खेळवण्यात आलेली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना ड्रॉ झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी सिरीज जिंकली. दुसरीकडे पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील सिरीज देखील समाप्त झाली. अशातच आता प्रत्येकाची नजर ही भारत-ऑस्ट्रेलिया सिरीज आणि न्यूझीलंड-श्रीलंका यांच्या सिरीजवर असणार आहे. मात्र आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे, तो म्हणजे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलमध्ये धडक मारणार का?

कसं आहे पॉईंट्स टेबलचं गणित?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 टीम पोहोचतात. आता ऑस्ट्रेलिया नंबर- 1 असून टीम इंडिया या टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याच्या स्थितीमध्ये या दोन्ही टीम फायनलमध्ये धडक मारण्याची शक्यता आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना ड्रॉ झाल्याने श्रीलंकेला मोठा फायदा झाला आहे. 

श्रीलंका करणार टीम इंडियाचा गेम? 

या टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन सिरीज अजून बाकी आहे. या दोन सिरीजनंतर ठरणार की श्रीलंका, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील कोणती टीम फायनलमध्ये खेळणार. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया 75.56 पॉईंट्स, भारत 58.93 पॉईंट्स आणि श्रीलंका 53.33 पॉईंट्सवर अनुक्रमे 3 स्थानांवर आहे. 

टीम इंडिया कशी पोहोचणार फायनलमध्ये? 

भारताला फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्ट सिरीज खेळायची आहे. यावेळी दोन्ही टीम्समध्ये 4 सामने होणार आहेत. जर टीम इंडियाने ही सिरीज 4-0, 3-1 अशी जिंकली किंवा 2-2 ने ड्रॉ जरी केली तरीही ती फायनलमध्ये धडक मारणार आहे. दरम्यान न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्येही 2 सामन्यांची सिरीज होणापर आहे. जर ऑस्ट्रेलियाविरूद्ध टीम इंडिया हरली आणि न्यूझीलंडविरूद्ध श्रीलंका जिंकली तर श्रीलंकेला फायनलचं तिकीट मिळणार आहे. 

असं मानलं जातंय की, श्रीलंकेला न्यूझीलंडच्या धर्तीवर खेळून विजय मिळवणं कठीण जाणार आहे. अशात जर श्रीलंका 0-2 ने सिरीज हरली आणि टीम इंडियाही 1-3 ने सिरीज हरली तरीही ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत अशी फायनल रंगणार आहे. टीम इंडियाला भारतातच ऑस्ट्रेलियाविरूद्ध सिरीज खेळायची आहे, त्यामुळे भारताचं पारडं जड मानलं जातंय. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *