Headlines

Work From Home : आता घरबसल्या कमवू शकता पैसे, डॉलर्समध्ये कराल कमाई

[ad_1]

Online Work from Home :सध्याच्या डिजीटल युगात आता सारं काही ऑनलाईन उपलब्ध आहे. आपण सगळेच रोजच्या संपूर्ण दिवसभरातील कितीतरी वेळ हा फक्त आणि फक्त इंटरनेटवर घालवत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याच इंटरनेटच्या मदतीनं तुम्ही पार्ट-टाईम किंवा फुल टाईम काम करुन लाखो रुपये देखील कमावू शकता. विशेष म्हणजे घरबसल्या करु शकणाऱ्या या कामांमध्ये डॉलर्समध्ये तुम्ही पैसे कमावू शकता ज्यामुळे तुम्हाला भारतीय रुपयांच्या तुलनेत मोठी रक्कम मिळू शकते. तर अशाचप्रकारे ऑनलाईन पद्धतीने काम करुन घरबसल्या पैसे कमावण्याचे काही पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या काही कामांमध्ये तुम्हाला जास्त ट्रेनिंगची गरज नसून तुम्ही लवकर हे काम शिकू शकता…

​ड्रॉपशिपिंग व्यवसाय

​ड्रॉपशिपिंग व्यवसाय

तर ड्रॉपशिपिंग हे ऐकून सर्वांनाच याबाबत माहित असेल असं नाही. पण हे एक सोप्या पद्धतीनं पैसे कमावण्याचं साधन आहे. तर यासाठी तुम्हाला मोठं दुकान किंवा अधिक जागा असं सारं लागणार नाही. सोप्या शब्दात म्हणजे तुम्ही एखादं प्रोडक्ट एखाद्या जागून स्वस्तात खरेदी करुन दुसरीकडे कमी किंमतीत ऑनलाईनच विकू शकता. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट बनवत नसून एक थर्ड पार्टी म्हणून काम करता.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

​फ्रीलान्स काम

​फ्रीलान्स काम

ऑनलाईन काम सुरु करण्याचा सर्वात सोपा आणि बेसिक पर्याय म्हणजे फ्रीलान्स वर्क. म्हणजेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं विविध कंपन्यांसाठी तुमच्या वेळेनुसार काम करु शकता. यामध्ये कंटेट ट्रान्सलेट करणं, आर्ट्स बनवणं त्यांना विकणं अशी विविध घरबसल्या अधिक वेळ न देता करता येणारी काम आहेत. या सर्व कामांद्वारे तुम्ही पैसे कमावू शकता.

​​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

ब्लॉगिंग

ब्लॉगिंग

जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि तुमचं लिखाणही भारी असेल तर ब्लॉगिंग एक भारी पर्याय आहे तुमच्याकडे. कारण जर अनेकांना तुमचं लिखाण आवडत असेल तर तुम्ही अशा काही वेबसाईट्सवर अकाउंट तयार करु शकता ज्याठिकाणी तुम्ही लिहिलेल्या ब्लॉग्सवरु तुम्हाला पैसे मिळतील. या साईट्सवर तुम्ही मोफत तुमचे ब्लॉग टाकू शकता आणि अनेकांना हे ब्लॉग्स आवडल्या त्यांच्या सतत त्या पेजवर येण्याने जाहिरांतीच्या मदतीने तुम्हीही कमाई कराल.

​वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

​ऑनलाईन सर्व्हे

​ऑनलाईन सर्व्हे

तर अशा कितीतरी वेबसाईट्स आहेत, ज्या इंटरनेटवर ऑनलाईन सर्व्हेमध्ये भाग घेणाऱ्या युजर्सना कितीतरी गिफ्ट कार्ड्स तसंत कॅश देत असतात. तर हे सारे सर्व्हे नेमकं युजर्सना एखाद्या साईटवर युजर्सना काय आवडतं काय आवडत नाही अशाप्रकारच्या आवडी निवडी, मतं जाणून घेण्यासाठी करतात.अनेकदा कितीतरी सर्व्हेवर साईन अप बोनसही असतो. अशा ऑनलाईन सर्व्हेमध्ये डॉलर्समध्ये कमाई करता येते.

​वाचा : ​Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

​सोशल मीडिया आणि यूट्यूब

​सोशल मीडिया आणि यूट्यूब

जर तु्म्ही इतरांना एन्टरटेंन करु शकता तसंच तुम्हाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असेल तर तुम्ही या सर्वांतूनही पैसे कमावू शकता. सोशल मीडिया जसंकी फेसबुक, इन्स्टाग्राम यावर व्हिडीओ, फोटोसह इतर पोस्टटाकून तु्म्ही पैसे ऑनलाईन कमावू शकता. तसंच एखाद्या ब्रँडसमोबत पार्टनरशिप करु पेड कॅम्पेनद्वारेही पैसे कमवू शकता.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *