Headlines

जेव्हा शाहरुख खाननं गौरीला सांगितलं बुरखा घाल अन् नमाज…

[ad_1]

Shah Rukh Khan and Gauri Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही चांगलीच चर्चेत असते. गेल्या तीन दशकांपासून ते दोघं इतर जोडप्यांसाठी आयडल कपल ठरत आहेत. असं नाही की त्यांच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी या सुरुवातीपासून स्थिरस्थावर होत्या. त्या दोघांनी वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. फक्त वैवाहिक नाही तर तिथपर्यंत पोहचण्याआधी देखील त्यांनी खूप स्ट्रगल केलं. सुरुवातीला गौरीचं कुटूंब या लग्नाच्या विरोधात होतं. कारण शाहरुख एका वेगळ्या धर्माचा आणि त्यातही नवोदित अभिनेता. पण त्या दोघांनी कधीच विश्वास गमावला नाही आणि अखेर त्यांचे लग्न झाले. 1991 मध्ये त्या दोघांचं हिंदू परंपरेनं लग्न झालं. दरम्यान, लग्ना दरम्यान, शाहरुखनं गौरीच्या कुटुंबासोबत कसा प्रँक केला होता याविषयी खुलासा केला आहे. यावेळी त्यानं गौरीला बुर्खा घालून नमाज पठण करण्यास सांगितलं होतं.  

शाहरुख खाननं एका मुलाखतीत खुलासा केला होता की लग्नाच्या दिवशी त्यानं गौरीच्या कुटुंबासोबत एक प्रँक केला होता. गौरीचं कुटुंब हे रुढिप्रिय आहे आणि त्याला त्यात काहीही हरकत नाही. त्यांच्यासोबत केलेल्या मजेशीर प्रँकविषयी सांगत शाहरुख म्हणाला, त्या रिसेप्शन पार्टीत, मी जवळपास मध्यरात्री 1.15 मिनिटांनी पोहोचलो, तेव्हा ते सगळे बसले होते आणि तिथे सगळे चर्चा करत होते की हा मुस्लिम मुलगा आहे. तो मुलीचं नाव बदलेल का? आता ती मुस्लिम होईल का? 

हा संपूर्ण प्रसंग पंजाबीमध्ये सुरु असल्याचं शाहरुख खाननं सांगितलं. ही चर्चा सुरु असताना त्यानं त्यांच्याकडे पाहिलं आणि गौरीला सांगितलं की तू लगेच बुर्खा परिधान कर, आपल्याला नमाज पठण करायचे आहे. शाहरुखचे हे शब्द ऐकताच गौरीचं कुटुंब त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागलं आणि त्यांना प्रश्न पडला होता की शाहरुखनं आधीच गौरीचं नाव बदललं की काय? त्या क्षणी त्यांची आणखी मज्जा घेण्यासाठी शाहरुख तिच्या कुटुंबाला म्हणाला, ती कायम स्वरूपी बुर्खात राहिल आणि कधीच घराच्या बाहेर जाणार नाही. ‘बॉलिवूड शादी डॉटकॉम’नं याविषयी माहिती दिली आहे.

हेही वाचा : राज कुंद्राच्या पॉर्न स्कॅंडलवर फराह खान बनवणार चित्रपट!

शाहरुख खान आणि गौरी यांच्यातील प्रेमाविषयी बोलाताना अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की त्यांच्यात असलेलं प्रेम आम्ही सेटवर पाहत होतो. तो ज्या प्रकारे गौरीसोबत राहत होतो, ती गुलाबांच्या पाकळ्यांनी बनलेली आहे असं तो रहायचा. हे खूप सुंदर होतं. शाहरुख आणि सुचित्रा हे 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी हाँ कभी ना’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *