Headlines

Video: “तुम्ही मला…”; गुवाहाटीचा उल्लेख करत चिमुकलीने अशी काही मागणी केली की मुख्यमंत्री शिंदे नि:शब्द झाले अन्… | little girl ask promise from CM Eknath Shinde that he will take her for trip to guwahati in Diwali vacation scsg 91

[ad_1]

महाविकास आघाडीमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी स्वपक्षाविरोधात बंड केलं. त्यानंतर १० दिवसांमध्ये सत्तापालट होऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. महाराष्ट्राबरोबरच देशभरामध्ये चर्चेत राहिलेलं हे सत्तांतरण अजूनही चर्चेत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर परिस्थितीच्या दौऱ्यापासून ते अगदी दिल्ली दौऱ्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. त्यातही मुख्यमंत्री शिंदेंचे वारकऱ्यांना मदत करण्यापासून ते पूर परिस्थितीचा फोनवरुन आढावा घेण्याचे, चिमुकल्या समर्थकांशी फोनवर चर्चा करण्याचे व्हिडीओही चांगलेच व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एका चिमुकलीने मुख्यमंत्री शिंदेंकडे गुवाहाटीसंदर्भात एक अजब आश्वासन मागितलं. तिची मागणी ऐकून मुख्यमंत्री नि:शब्द झाले तर सर्व उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पहायला मिळालं.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

झालं असं की, रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिस मिडीयम स्कूल इथं शिकणाऱ्या अन्नदा डामरे या चिमुकलीने रविवारी शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या बंगल्यावर भेट घेतली. या भेटीदरम्यान अन्नदाने एकनाथ शिंदेंकडे एक अजब प्रॉमिस मागितलं. “तुम्ही पाण्यात जाऊन पूरग्रस्तांना मदत केली. मी पण पूरग्रस्तांना पाण्यात जाऊन मदत केली तर मला पण मुख्यमंत्री होता येईल?” असा प्रश्न विचारल्यानंतर सर्वच उपस्थित हसू लागले. मुख्यमंत्री शिंदेंनी या चिमुकलीच्या खांद्यावर हात ठेवत, “होता येईल, होता येईल” असं म्हटलं.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

पुढे बोलताना या चिमुकलीने, “पूर्वी ना मला फक्त मोदीजी आवडायचे. पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्ही पण आवडता,” असंही म्हटलं. मुख्यमंत्र्यांसमोर अगदी मनमोकळेपणे बोलताना अन्नदाने तुम्ही आता नावाला वेळ कसा देणार हे सुद्धा विचारलं. “तुम्ही आता रुद्रांक्षला वेळ कसा देणार?” या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी अगदी हातवारे करुन, “मी त्याला भेटायला ठाण्याला जाणार होतो. पण तोच मला भेटायला इकडे आलाय,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

भेटीच्या अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये जाता जाता अन्नदाने मुख्यमंत्र्यांकडे एक प्रॉमिसही मागितलं. “येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाल?,” असा प्रश्न या चिमुकलीने विचारला. प्रश्न ऐकताच सर्व उपस्थित मोठ्या हसू लागले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय बोलावं हेच कळत नव्हतं अशी परिस्थिती झाल्याने त्यांनी फक्त हसत मान हलवली. “कामाख्या मंदिरामध्ये देवीचं दर्शन करायचं ना?” असं शिंदे यांनी विचारलं असताना या मुलीने होकार्थी मान डोवली. मुख्यमंत्र्यांनी तिचा गाल ओढला नंतर प्रेमाने गालावरुन हात फिरवत, “फार हुशार आहे,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> ‘गरज पडली तर…’ ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही आधी…”

नक्की पाहा >> Photos: “मला वाटतं त्यांचं…”; २०० जागा जिंकण्याच्या CM शिंदेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकून पिकला एकच हशा

२१ जूनला शिवसेनेविरोधात बंड करत सुरतमध्ये गेलेले एकनाथ शिंदे २२ जूनच्या पहाटे समर्थक आमदारांसहीत गुवाहाटीमध्ये दाखल झाले. पुढील आठ दिवस टप्प्याटप्यात शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गुवाहाटीला गेले होते. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांमध्ये सर्व बंडखोर शिवसेना आमदार गुवाहाटीमधून गोव्यात आले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *