Headlines

VIDEO: विवस्त्र अभिनेत्रींना दाखवून पैसे कमवण्याची स्ट्रॅटजी; स्मिता पाटील यांनी समोर आणलेली ‘ही’ बाब

[ad_1]

Smita Patil on Female and Male Nudity: ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. आज त्यांची कमतरता ही मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला जाणवल्यावाचून राहत नाही. 1986 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला परंतु आजही त्या प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या स्मरणात आहेत. त्यातून आजतागायत त्यांच्या आठवणींना त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरही सदैव उजाळा देताना दिसतो. तोही याच चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्याचीही लोकप्रियता कायम आहे. आज स्मिता पाटील यांच्या एका मुलाखतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यात त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक पैलू हे अगदी सफाईदारपणे मांडले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी त्यांनी आपल्या या मुलाखतीत आपली स्पष्ट मतंही मांडली होती. आपण सध्या चित्रपटांमध्ये पाहतो की नग्नता ही हमखास दिसते. परंतु चित्रपटसृष्टीच्या या प्रभावी माध्यमावर ही गोष्ट किती योग्य अथवा अयोग्य याचीही आपण चर्चा करतो. 

यावर स्मिता पाटील यांनी भाष्य केले होते. मध्यंतरी त्यांचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला होता ज्यात त्यांनी दुरदर्शनला मुलाखत दिली होती. त्यांनी या मुलाखतीतून स्त्री आणि पुरूष यांच्या नग्नतेवरील फरक सांगितला होता सोबतच त्यांनी कशाप्रकारे चित्रपट हे प्रमोट केले जातात यावरही भाष्य केले होते. त्यांच्या या व्हिडीओची बरीच चर्चा रंगेलेली होती. त्या यावेळी काय म्हणाल्या आहेत हे आपण पाहुया. 

त्या म्हणाल्या की, ”भारतीय प्रेक्षकांवर ही गोष्ट दाबवून सांगितली जाते की बाबा हे पाहा, या चित्रपटात तर सेक्स आहे. यात तर अर्ध्याहून अधिक स्त्रियांचे नग्न सीन्स आहेत. तेव्हा तुम्ही चित्रपट पाहायला या. अशाप्रकारे एक वेगळीच विचारधारा याद्वारे लागू झाली आहे जी अत्यंत चूकीची आहे.” त्या पुढे म्हणतात की, ”हिरोला तर तुम्ही नग्न दाखवू शकता त्याला तर काहीच होणार नाही आणि जर तुम्ही महिलेला नग्न दाखवलंत तर या निर्मात्यांना असं वाटतं की 100 लोकं अजून येतील.” स्त्रियांना चित्रपटाच्या प्रमोशनल स्ट्रॅटजीसाठी वापरण्यात येते असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यांना नग्न दाखवले की प्रेक्षक आपोआप प्रेक्षकांगृहात गर्दी करतात असं त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे अशा चित्रपटांची जोरात चर्चा होते. 

पाहा व्हिडीओ : 

Late Smita Patil on women’s objectification as a strategy to sell films.
byu/Iamrandom17 inBollyBlindsNGossip

सध्याही आपल्याला हा वाद पाहायला मिळतो. त्यामुळे तेव्हा स्मिता पाटील यांचे स्पष्ट आणि थेट उत्तर हे आजही लागू होते त्यावरून आपल्या लक्षात येईल की त्यांची दूरदृष्टी ही किती महत्त्वाची होती. स्मिता पाटील यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यांच्या अनेक भुमिका या लक्षात राहणाऱ्या ठरल्या आहेत. ‘मंथन’, ‘भुमिका’, ‘आक्रोश’, ‘नमक हलाल’, ‘बाजार’, ‘उंबरठा’, ‘अर्थ’,’मंडी’, ‘मिर्च मसाला’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी भुमिका केल्या आहेत.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *