Headlines

Video : शाकिबच्या ‘या’ एका थ्रोने पलटला सामना; नाहीतर झाला असता बांगलादेशचा पराभव

[ad_1]

बांगलादेशने (bangladesh) टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 world cup 2022) तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेवर (zimbabwe) तीन धावांनी विजय मिळवला. या रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर बरेच नाट्य पाहायला मिळालं. मोसाद्देक हुसेनचा (mosaddek hossain) शेवटचा चेंडू डॉट (Dot Ball) झाल्याने सर्व खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण त्यानंतर थर्ड अम्पायरला (third umpire) रिप्लेमध्ये असे काही दिसले, त्यानंतर सर्व खेळाडूंना पुन्हा मैदानात बोलावावे लागले. यानंतर सामन्यातील शेवटचा चेंडू पुन्हा टाकण्यात आला आणि बांगलादेशने हा सामना 4 ऐवजी 3 धावांच्या फरकाने जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने (bangladesh) 150 धावा केल्या होत्या, या धावसंख्येसमोर झिम्बाब्वेला (ban vs zim) 20 षटकात केवळ 147 धावांपर्यंत मजल मारता आली. (T20 world cup 2022 ban vs zim shakib al hasan run out sean williams)

मात्र 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत झिम्बाब्वेचा (zimbabwe) संघ सामन्यात पुढे दिसत असला तरी चौथ्या चेंडूवर शाकिब अल हसनने (shakib al hasan) थ्रो मारल्याने सामन्याचे चित्र पालटले. कर्णधार शकीब अल हसनने (shakib al hasan) बांगलादेशसाठी 19 वे षटक टाकले. त्याने पहिल्या 3 चेंडूत 7 धावा दिल्या. झिम्बाब्वेला (zimbabwe) पुढच्या नऊ चेंडूत 19 धावा करायच्या होत्या आणि झिम्बाब्वेसाठी हे काम सोपं होतं, कारण सीन विल्यम्स (sean williams) आणि रायन बर्ल (Ryan Burl) यांनी चांगली भागीदारी रचली होती. विल्यम्सने 64 आणि बर्लने 27 धावा केल्या होत्या, पण 19व्या षटकातील चौथ्या चेंडूने खेळ उलटवला.

हे ही वाचा >> ये क्या हुआँ भाई! बांगलादेशचा संघ सामना जिंकलां पण शेवटचा चेंडूमुळे पुन्हा एकदा…

शाकिबचा हा चेंडू सीन विल्यम्सने खेळला, पण चेंडू शाकिबच्या जवळच गेला आणि याचदरम्यान शॉन विल्यम्स धावला. पण शाकिबने चेंडू स्विंग करून त्याच्या डाव्या हातात पकडला. चेंडू हातात येताच शाकिबने नॉन स्ट्राईकच्या स्टंपला लक्ष्य केले आणि त्याच्या जोरदार थ्रोमुळे स्टंप बेल्स खाली पडल्या. शॉन विल्यम्स त्यावेळी क्रिझमध्ये नव्हता. या थ्रोने बांगलादेशने पुनरागमन केले आणि अखेरीस सामना 3 धावांनी जिंकला, कारण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या आणि बर्ले नॉन-स्ट्राइकिंग एंडवर राहिला.

दरम्यान, 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात खूपच खराब झाली. वेस्ली मधवेरे 4 आणि क्रेग एर्विन 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. दोन्ही फलंदाजांना तस्किन अहमदने बाद केले. त्याचवेळी, पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मुस्तफिझूरने फॉर्मात असलेल्या सिकंदर रझाला (0) मिल्टन शुम्बा (8) यांना बाद केले.

हे ही वाचा >> दोन पराभवानंतरही Pakistan सेमीफायनलमध्ये पोहोचणार?

झिम्बाब्वेला पाचवा धक्का 69 धावांवर रेगिस चकाबवाच्या रूपाने बसला, ज्याला 15 धावांवर तस्किनने बाद केले. त्यानंतर शॉन विल्यम्सने रायन बर्लसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले, पण 19व्या षटकात 64 धावा काढून तो धावबाद झाला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *