Headlines

Video : रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही! Bharat Jadhav ने का केली अशी घोषणा?

[ad_1]

Bharat Jadhav News : कोकण हे निसर्गरम्य आणि पर्यटनांसाठी सर्वात आवडीचं ठिकाण आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा लोकांना कोकणात फिरायला जायला खूप आवडतं. कोकणातील प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे रत्नागिरी…पण या रत्नागिरीत पुन्हा नाटकाचे शो करणार नाही असा निर्धार अभिनेता भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं अशी घोषणा करण्यामागे काय घडलं. भरत जाधव एवढे नाराज का झाले हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. (Ratnagiri news)

प्रेक्षकांची मागितली माफी!

कलाप्रेमी म्हणून रत्नागिरीची ओळख पण याच कलानगरीत भरत जाधव यांनी पुन्हा नाटक करणार नाही अशी घोषणा केली. झालं असं की भरत जाधव यांनी नाट्यगृहांची अवस्था चव्हाट्यावर आणली आहे. मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याने भरत जाधव नाराज झाले आहेत. एवढंच नाही तर साऊंड सिस्टिंमवरून त्यांनी खेद व्यक्त केला आहे. (Bharat Jadhav make the announcement Will not show again in Ratnagiri ac and sound system bad condition in theatre)

शनिवारी रत्नागिरीत तू तू मी मी या नाटकाचा प्रयोगावेळी भरत जाधव यांनी ही समस्या मांडली आणि परत रत्नागिरीत पाय ठेवणार नाही अशी घोषणाच केली. नाटक सुरु असतानाच भरत जाधव प्रेक्षकांना म्हणाले की, “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पहा” ”नाट्यगृहाची अशी अवस्था असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता”, असा प्रश्न विचारत त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत, पुन्हा रत्नागिरीत शो करणार नाही, असं सांगितलं. 

एखाद्या कलाकारावर असे प्रयोग थांबून नाट्यगृहाची अवस्था अशी चव्हाट्यावर मांडण्याची वेळ यावी, असे अतिशय दुदैवी गोष्ट आहे. भरत जाधव यांच्या घोषणेनंतर तरी सांस्कृतिक मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाग येईल का? हे बघावं लागेल. पण रत्नागिरीकरांसाठी ही अशी नामुष्की आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेकडून अनेक वेळा या सावकर नाट्यगृहाची (Savkar Theater Ratnagiri) डागडुजी करण्यात आली आहे, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान भरत जाधव यांची घोषणा करण्यात आलेला व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर devendra jadhav या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *