Headlines

Video : …आणि वेदनेनं विव्हळणारी राखी कोसळली; आईच्या निधनानंतर मारहाण, संसारही मोडला

[ad_1]

Rakhi Sawant Video :  डान्सर आणि अभिनेत्री राखी सावंत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते. कारण तिच्या खाजगी आयुष्यात नेहमी काही ना काही घडतं असते. तिच्या आयुष्यात कधीही तिला खरं प्रेम मिळालं नाही. आदिल दुर्रानी तिच्या आयुष्यात आला… आता तरी सगळं ठिक होईल पण गेल्या काही दिवसांपासून यातही अनेक ट्विस्ट आलेत…त्यामुळे हा सगळा राखी सावंतचा ड्रामा आहे असंच म्हणत आहेत.  मारहाण, पैसे चौरल्याचा आरोप केल्यानंतर नवऱ्यासोबत डिनर डेट, आदिलला अटक आणि आता राखीचा तो व्हिडीओ व्हायरल तिचं खाजगी आयुष्य प्रचंड चर्चेत आलं आहे.  (trending video adil khan arrested rakhi sawant update many criminal cases Dinner date accused of beating stealing money)

आईचं आजारपण ते नवऱ्याकडून मारहाण

आईच्या आजारपणामुळे त्रस्त असलेल्या राखीने तिच्या बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आदिलकडून या लग्नाचं खंडन करण्यात आलं. राखी प्रचंड रडत होती…मीडियासमोर आपलं रडगाण सांगत होती. अशातच एक दिवस आदिलने या लग्नाची कबुली दिली. आता सगळं ठिक होईल तर तिच्यावर दु:खाचं डोंगर कोसळलं.

आईच्या निधनाने राखी खचली. यावेळी आदिल तिच्यासोबत दिसतं होता. आता तिच्या आयुष्यात खरं प्रेम आलं आहे असं वाटायला लागलं होतं. पण नियतीच्या मनात काही औरच होतं. 

पती पत्नी और वो… 

पती आदिल खान दुर्रानी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे, असा आरोप करणारा राखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची चर्चा सुरु असताना अदिलच्या गर्लफ्रेंडचा फोटोही समोर आला.

आता काय तर राखीने आदिलवर गंभीर आरोप केले. आदिलने राखीला मारहाण केली आणि तिचे दागिने आणि पैसे घेतल्याचा आरोप तिने केला.

आदिल खानविरोधात कर्नाटकमधील म्हैसूर इथं अनेक गुन्हे दाखल असल्याचं राखीने जगाला सांगितले. आदिलला पोलीस 1 तारखेला उचलून घेऊन गेले होते आणि दोन दिवस तुरुंगात ठेवले होते, असा दावा राखीने केला आहे. 

मारहाण, पैसे चोरल्याचा आरोप केल्यानंतर डिनर डेट

आता हे पाहा ना सकाळी तिने आदिलवर मारहाण, पैसे चोरल्याचा आरोप त्यानंतर रात्री त्याच्यासोबत डिनर डेटला गेली होती. यावेळी त्यांनी एकमेकांना घासही भरवला. या डिनर डेटचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

या विषयावर चर्चा होतंच होती की तिच्या नवीन व्हिडीओ समोर आला ज्यात तिने आदिलने तिला कशी मारहाण केली हे ती सांगत होती. त्याचा या संकटात तिचा भाऊ खंबीरपणे उभा होता. त्याने राखीच्या अंगावरील जखमा असलेले फोटो मीडियाला दाखवले. 

दरम्यान राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आदिलला 7 फेब्रुवारीला (मंगळवारी) ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्याबाहेर राखी जेव्हा पापाराझीशी बोलत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. 

या घटनेनंतर सगळे गोंधळे, त्यांनी राखीला सांभाळण्याचा प्रयत्न केला. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पण काही नेटकरी यावरुनही राखीला ट्रोल करत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *