Headlines

वटपौर्णिमा कथा व महत्त्व

आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीचे फार महत्व आहे. त्यात स्त्रीसाठीचे सण आहेत. जसे नागपंचमी, संक्रांत, हरतालिका, लक्ष्मीपूजन हे सण आहेत. तसेच वटपौर्णिमा हा एक सण आहे. आपल्या महाराष्ट्रीय स्त्रिया मोठ्या हौसेने हे सण साजरे करतात त्यात त्यांना विशेष शृंगार करून विवाहित स्त्रिया हे सण साजरा करतात. 

हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणारी ही वटपौर्णिमा साजरी करतात. आपापल्या भागातील स्त्रिया एकत्रित येऊन पूजा करतात. पूजेचे साहित्य तबक, हळदी-कुंकू , पानसुपारी, तुपाचा दिवा, गहू किंवा तांदूळ ओटी भरण्यासाठी ,दूध , पाणी, साखर,  आंबे इत्यादी  पूजेचे साहित्य असते. त्याप्रमाणे स्त्रिया विधियुक्त पूजा करतात. सुवासिनी भक्तिभावानं भावाने  वडाची पूजा करतात.  जन्मोजन्मी हाच पती मिळावा,  त्याला आरोग्य व आयुष्य चांगली लाभावे, अशी यामागची भावना असते.

पुरातन काळात घडलेली त्यामागचे सत्य कथा आहे. भद्र देशाचा राजा अश्वपती त्याची सावित्री ही कन्या. धुर्मसेंन नावाचा अंधराजा त्याचा सत्यवान हा मुलगा होय.  धुर्मसेंन हा शत्रूकडून हरल्यामुळे ते जंगलामध्ये कुटुंबासहित राहू लागले. यावेळी सावित्री सत्यवान हा आपला पती परमेश्वर व्हावा  असे पित्याकडे हट्ट करू लागली.  

अश्वपती राजा पित्याने विवाहाला नकार दिला परंतु सावित्रीने आईवडिलांची न ऐकता सत्यवानाशी विवाह केला. सावित्रीला सत्यवानाचे मरण तीन दिवसावर आहे असे समजताच तिने तीन दिवस उपवास केला. त्यादरम्यान सत्यवान हा लाकडे आणण्यासाठी जंगलात जात असताना मूर्च्छित होऊन पडला. तेव्हा यमधर्म सत्यवानाचे प्राण घेऊन जात असताना सावित्री मागे मागे जात होती. सत्यवानाला नेऊ नका असे यमधर्माल विनंती करू लागली. 

शेवटी यमधर्माने सत्यव सोडले व यमराज ने सावित्रीला तीन वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने चाणाक्ष होऊन तीन वर मागितले. सासूसासऱ्याचे प्राण, राज्य परत मिळावे व आपल्याला पुत्र व्हावा असे तीन वर मागितले. गफलतीने यमधर्माने तथास्तु असे म्हटले. त्यामुळे यमधर्माला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. 

सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली परत मिळाले म्हणूनच ज्येष्ठ महिन्यात मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.  जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, पतीची आरोग्य व दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात अशी कथा आहे.

स्वलिखित: श्रीमती आशा चंद्रकांत कुमणे, सोलापूर. 

श्रीमती आशा चंद्रकांत कुमणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *