Headlines

Vastu Tips: तुमच्या घरातील खिडक्या ‘या’ दिशेला चुकूनही नसाव्यात, वाईट परिणाम भोगावे लागतील!

[ad_1]

Vastu Tips Window : सामान्यतः एखाद्या व्यक्ती त्याच्या स्वप्नांप्रमाणे घर सजवतो. घरात आनंद कायम ठेवण्यासाठी, ते सुंदर बनवण्यात तो कसलीच कसर सोडत नाही. मात्र, अनेक वेळा घर बांधताना खिडक्यांकडे (Home Window) पुरेसं लक्ष देता येत नाही. तर बाहेरची शुद्ध हवा (Fresh Air) आणि सूर्यप्रकाश (sunlight) घरात आणण्याचं काम ते करतात. या खिडक्या तुमचं बंद नशीब उघडायलाही मदत करतात, त्यामुळे या खिडक्यांना कोणत्याही परिस्थितीत वास्तू बनवलं पाहिजे. 

आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की घराच्या खिडक्या कशा बनवायला हव्यात. वास्तुशास्त्रानुसार, खिडक्या कोणत्या दिशेला असव्यात हे पाहूया.

खिडक्या कोणत्या दिशेला असाव्यात

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला खिडक्या बनवणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, या दिशांना बनवलेल्या खिडक्या समृद्धी आणि संपत्तीचे दरवाजे उघडतात. त्यामुळे कुटुंबात आनंद कायमच राहतो.

घराच्या पूर्व दिशेला जास्तीत जास्त खिडक्या लावाव्यात. वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेला उघडणाऱ्या खिडक्या शुभ मानल्या जातात. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि कुटुंबातील सदस्यांच्या यशाचा मार्ग मोकळा होतो.

या दिशेला नसाव्यात खिडक्या

नवीन घर बांधताना दक्षिण दिशेला खिडक्या करणं टाळावं. वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशा ही मृत्यूचा स्वामी यमराजाची दिशा मानली जाते. अशा परिस्थितीत घराच्या खिडक्या दक्षिण दिशेला केल्या तर तिथून येणारी नकारात्मक ऊर्जा घरातील सदस्यांना आजारी बनवू शकते.

घरातील खिडक्यांबाबत काही नियम

वास्तू शास्त्राप्रमाणे, घरातील खिडक्या नेहमी योग्य दिशेने आणि आकाराच्या असल्या पाहिजेत. वास्तूनुसार, घरातील खिडक्यांची संख्या ही नेहमी सम असली पाहिजे म्हणजे 2, 4, 6, 8, 10.

वास्तूनुसार, खिडकीतून येणारा प्रकाश आणि हवा तुमच्या घरात सुख आणि सौभाग्य आणतं. उत्तर दिशेला बनवलेल्या खिडक्या घराची समृद्धी टिकवून फायदेशीर ठरतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *