Headlines

वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांना अटकदीड लाखांची लाच मागितली

[ad_1]

वसई तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसलीदार प्रदीप मुकणे यांना दोन लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी सोमवारी रात्री ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. मुकणे यांच्या वतीने लाखेची रक्कम स्वीकारणारे मंडल अधिकारी संजय सोनावणे यांना दीड लाख रुपये घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. मुकणे यांच्या अटकेने वसईत खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने वसई पूर्वेच्या गोखीवरे येथे भूमापन क्रमांक २३३ हिस्सा क्रमांक अ/३ येथे जमीन विकत घेतली होती. या जमिनीचा फेरफार रद्द करण्यासाठी वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे (५३) यांनी २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी सापळा लावण्यात आला होता. दुपारी ३ वाजता माणिकपूर विभागाचे मंडल अधिकारी संजय सोनवणे यांना दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर ४ वाजता मुकणे यांना कार्यालातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

पोलिसाकडूनही घेतली होती लाच!

मुकणे यांनी लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांनी सांगितले. लाचलुचपत खात्याच्या ज्या पोलिसांनी पकडलं त्या पथकातील एका पोलिसकडूनही काही वर्षांपूर्वी मुकणे यांनी एक काम करून देण्यासाठी ३० हजार रुपये घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रदीप मुकणे यांची आत्तापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांच्या विरोधात यापूर्वी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *