Headlines

Valentine Week Love Horoscope : व्हॅलेंटाईन वीकमध्ये तूळ आणि धनु राशीसह ‘या’ 5 राशीत असणार प्रेमच प्रेम

[ad_1]

Valentine Weekly Love Horoscope 06 to 12 February :  हा महिना प्रेमी युगुलांसाठी खास आहे. अनेक जण या महिन्याची वाट पाहत असतात. कारण आपण ज्याचावर प्रेम करतो त्याला प्रेम जाहीर करण्याचा हा आठवडा. मंगळवारी 7 फेब्रुवारीपासून रोज डे सुरु होणार…प्रेमींसाठी हा आठवड्या प्रेमीसाठी चांगलं भाग्य घेऊन आला आहे. कारण योगायोगाने प्रेमाचा ग्रह बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे  यंदाचा व्हॅलेंटाइन वीक तुमच्यासाठी किती रोमँटिक आणि रोमांचक असणार आहे. जाणून घ्या या आठवड्याचं राशीभविष्य…(Weekly Horoscope in Marathi) 

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमींसाठी आनंदादायी असणार आहे. तुमच्यामधील प्रेम जीवन मजबूत करण्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्या बाजूने निकाल देतील. आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल असेल आणि तुमचे मत उघडे ठेवल्यास भविष्यात तुमच्यासाठी आनंदी काळांचे दरवाजे उघडतील. (Valentine day 2023 Valentine Weekly Love Horoscope 06 to 12 February for All Zodiac in marathi news)

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. पण तुम्ही जर निष्काळजी आणि आळशी असाल तर प्रेम संबंधांमध्ये समस्या वाढू शकतात. सप्ताहाच्या शेवटी वेळ अनुकूल राहील आणि मन प्रसन्न राहील. मात्र, यावेळीही संवादातून समस्या सोडविल्यास बरे होईल.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेमप्रकरणासाठी त्रासदायक ठरू शकतो आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्ही संयम ठेवावा. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची किंवा तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. आठवड्याच्या शेवटी कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.

कर्क (Cancer)

आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीचे लोक त्यांच्या लव्ह लाईफबद्दल खूप निराश होतील. एकटेपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी, प्रेम जीवन रोमँटिक असेल आणि प्रेम मजबूत होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना देखील बनवू शकता.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा आनंद आणेल. परंतु तुम्ही त्या आनंदाकडे न पाहता निराशेकडे अधिक लक्ष द्याल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जितके अधिक भविष्याभिमुख असाल तितके तुम्ही जीवनात अधिक आरामशीर असाल.

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रेमप्रकरणात अहंकाराचा संघर्ष टाळावा, तर चांगले परिणाम समोर येतील आणि मन प्रफुल्लित राहील. कोणत्याही खरेदी इत्यादींबाबत वादही वाढू शकतात. सप्ताहाच्या शेवटी जीवनात आदर वाढेल आणि परस्पर प्रेम वाढेल. 

तुला (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या संमिश्र असणार आहे. थोडं प्रेम आणि थोडं गम असं काहीस हा आठवड्या राहणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी भरभरुन प्रेम वाढणार आहे.  

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनासाठी आनंददायी आहे. परस्पर समंजसपणाही चांगला राहील आणि मन प्रसन्न राहील. आठवड्याच्या शेवटी, जर तुम्ही परस्पर चर्चेद्वारे कोणताही गोंधळ सोडवला तर चांगले परिणाम दिसून येतील.

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमप्रकरणाच्या बाबतीत सर्व काही ठीक राहील, परंतु एखाद्या गोष्टीबाबत मनावर खूप ताण असेल आणि अस्वस्थता जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मात्र एखाद्या स्त्रीच्या मदतीने तुमच्या प्रेमजीवनात शांतता राहील.

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये वेळ अनुकूल असेल आणि परस्पर प्रेम मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्याने मन मात्र उदास राहील.

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रेमप्रकरणाच्या बाबतीत दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागू शकतं. कोणताही गोंधळ चर्चेने सोडवला पाहिजे तरच शांतता राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र वेळ अनुकूल होईल आणि परस्पर प्रेम दृढ होईल. 

मीन (Pisces)

या राशीसाठी हा आठवडा आनंददायी आहे. जरी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रेम जीवनातील कोणत्याही नवीन निर्णयाबद्दल थोडे साशंक असाल, परंतु जर तुम्ही या निर्णयाची अंमलबजावणी केली तर तुम्हाला जीवनात आनंद आणि सुसंवाद मिळेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *