Headlines

“तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या…”, Rishabh Pant च्या Car Accident नंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट व्हायरल

[ad_1]

Rishabh Pant Car Accident Urvashi Rautela Shares Post : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुडकीच्या (Roorki)  नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिल्लीला (Delhi Hospital) हलवण्यात आले आहे. हा अपघात इतका भयंकर होता पंतच्या कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे. त्यानंतर सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) इन्स्टाग्राम पोस्टनं वेधले. आता उर्वशीनं ऋषभ पंत आणि त्याच्या कुटुंबासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे, 

उर्वशीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्वशी म्हणते की मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या आरोग्याची प्रार्थना करते. मात्र, यावेळी उर्वशीनं कोणाचंही नाव घेतलेले नाही. तरी उर्वशीनं ही पोस्ट ऋषभ पंतसाठीच केली आहे असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. उर्वशीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

दरम्यान, उर्वशीनं काल ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये उर्वशीनं तिच्या फोटोशूटमधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत उर्वशीनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. उर्वशी या फोटोत प्रचंड सुंदर दिसत होती. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे उर्वशीनं दिलेल्या कॅप्शननं वेधले होते. उर्वशीनं हा फोटो शेअर करत प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. उर्वशीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

कसा झाला ऋषभ पंतचा अपघात?

दिल्लीवरून घरी परतत असताना ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली आणि हा अपघात झाला. रेलिंगला धडक दिल्यानंतर गाडीनं पेट घेतला आणि काही वेळातच ऋषभ पंतची गाडी जळून खाक झाली. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, ऋषभ पंतला गंभीर जखमा झाल्या असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा : Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली ‘ही’ पोस्ट

प्रत्यक्षदर्शींनीही ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकल्यानंतर क्षणात गाडीने पेट घेतला आणि काही वेळातच ती जळून खाक झाली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे पंत त्याच्या गाडीने दिल्लीवरुन रुडकी येथून त्याच्या घरी जात होता. त्याचवेळी नारसन गावाजवळ त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी रेलिंगला धडकून उलटली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *