Headlines

आज India vs Sri Lanka दुसरा वनडे; कोण जिंकणार सीरिज? इशान की सूर्यकुमारला संधी?

[ad_1]

India vs Sri Lanka 2nd ODI: भारताने पहिल्या वनडे सामन्यात दमदार विजय मिळवला. त्यानंतर आता भारत आणि श्रीलंका (ind vs sl 2nd odi) यांच्यातील दुसरा वनडे सामना आज (12 जानेवारी 2023) कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला दुसरा वनडे सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ चा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

टीम इंडियाने विजयी सलामी देत जिंकून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मालिका बरोबरी करण्यासाठी श्रीलंकेला दमदार खेळ दाखवावा लागणार आहे. जर या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला तर श्रीलंका टीमवर दौऱ्यात सलग दुसरी मालिक गमावण्याची नामुष्की ओढावी लागणार आहे.

अशी असेल प्लेइंग इलेव्हन?

पहिल्या सामन्यात शुबमन गिलसाठी द्विशतकवीर इशान किशनला बाहेर बसवण्यात आले. तर सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका करण्यात आली. आता दुसऱ्या सामन्यात रोहित प्लेइंग इलेव्हन इशान आणि सूर्यकुमारला संधी देणार का?

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह. 

श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा. 

लाईव्ह सामना कुठे पाहणार?

भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तसेच Hotstar वर लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. 

लाइव्ह मॅच मोफत बघता येणार

हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर पाहता येणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *