Headlines

तो धावत आला अन् सलमानला मिठीच मारली, VIDEO नं जिंकली लाखोंची मनं

[ad_1]

Salman Khan Video: अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. कधी त्यांच्या चित्रपटांसाठी नाहीतर त्यांच्या स्टाईलसाठी. आता अभिनेता सलमान खान हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एका व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. यामध्ये सलमान खानला (Salman Khan Video) पाहून लोकांनी त्यांचे प्रचंड कौतुक केले आहे. सलमान खानचा नुकताच ‘किसी का भाई किसी की जान’ (Salman Khan Film) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नव्हता.

परंतु आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटाची ‘टायगर 3’ (Tiger 3) ची. सध्या या चित्रपटाची सर्वत्र हवा आहे. सध्या सलमानचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? या व्हिडीओची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान आपल्या बॉडीगार्डसमवेत आला आहे. तेवढ्यात समोरून एक लहान मुलगा येतो आणि त्याला जोरात मिठी मारतो आणि मग त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. सुरूवातीला तुम्ही या व्हिडीओमध्य पाहू शकता की, सलमान आपणहून मागे वळून पाहतो आणि त्या मुलासाठी थांबतो. त्यांच्या थोडसं संभाषणही होतं. 

सलमान खान सध्या अजून एका कारणासाठी चर्चेत आहे ते म्हणजे त्याला काही दिवसांपासून धमकीचे फोनही येत आहेत. त्यामुळे त्याच्या घराभोवती सुरक्षिततेचा पहारा वाढविण्यात आला आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नव्हती. तरीही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर काही प्रमाणात यश मिळवलं आहे. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या आणि कतरिनाच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाची. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी नाना (Tiger 3 News) तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. 

हेही वाचा – बॉलिवूडच्या हॉटेस्ट बॉडीगार्डला पाहिलेत का? अभिनेत्यालाही देईल टक्कर

‘भाई की झलक सबसे अलग’, ‘हाच सलमान आणि शाहरूखमधला फरक आहे असंही काही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे’, असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय की,’ स्टार हो तो सलमान खान जैसा’, ‘रिअल मेगास्टार’ अश्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. त्यातून काहींनी म्हटलंय की, ‘सलमान हा आतून आणि बाहेरून सगळ्यात चांगला आहे.’

तर काहींनी वेगळंंच निरीक्षण केलं आहे. एका युझरनं लिहिलंय की, ‘कोणी नेटिस केलं का, सलमाननं रिंग घातली आहे.’ या व्हिडीओखाली त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स पाऊस पडाला आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरल होतो आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *