Headlines

‘हातात ब्लेड होतं अन् मग…’, चाहत्याशी हात मिळवणं अक्षय कुमारला पडलं महागात

[ad_1]

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि टायगर हे दोघेही सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशात अक्षय कुमारनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षयनं फॅन इंटरॅक्शनच्यावेळी त्याच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला. जो ऐकून टायगरला देखील धक्का बसला. 

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या दोघांनी रणवीर अल्लाहबादिया उर्फ बियर बायसेप्सच्या शो द रणवीर शोमध्ये हजेरी लावली होती. या वेळी खरंतर ते दोघं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते मात्र, त्यांनी अनेक खासगी गोष्टींविषयी देखील सांगितलं आहे. यावेळी रणवीरनं अक्षय कुमारला त्याच्या आयुष्यातील अशी एखादी चाहत्यासोबतची भेट सांगायला सांगितली ज्याला तो आजपर्यंत विसरला नाही. यावर अक्षय कुमारनं सांगितलं की “एकदा चाहत्याची फार गर्दी होती आणि मी त्यांच्याशी हात मिळवत होतो. तेव्हात मी पाहिलं की माझ्या हातातून रक्त येतंय. त्याच्यांपैकी एकानं हाताच्या नखात ब्लेड ठेवलं होतं आणि त्यानं असा हात कापला.” 

अक्षय कुमारचं हे वक्तव्य ऐकताच रणवीरनं म्हटलं की “सर तुमच्यावर काळी जादू करायची होती त्याला.” हे ऐकताच अक्षय म्हणाला की “तू फक्त काळ्या जादूविषयीच बोलत रहा. मी पाहिला आहे तुझा शो दरवेळी अशाच गोष्टी करतो. काळी जादु विषयीच विचार करत राहतो. मेल्यानंतर काय होणार? तू हा प्रश्नच जास्त विचारतोस.” हे ऐकल्यानंतर रणवीर हसतो. त्यासोबत अचानक शोचा शेवट दाखवण्यात आला आहे. त्यात अक्षय आणि टायगर त्याला एक सरप्राइज देताना दिसत आहेत. रणवीरसाठी हे दोघं काही परदेशी डान्सर्सना बोलावतात. हे पाहून रणवीरला आश्चर्य होतं. त्यानंतर ते तिघेही डान्स करु लागतात.  

हेही वाचा : पहाटेच्यावेळी वांद्रेच्या त्या जुन्या बिल्डिंगमध्ये का जातो अक्षय कुमार? अनेक वर्षांनंतर केला खुलासा…

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ विषयी बोलायचे झाले तर ते दोघे त्यांच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ते सगळीकडे त्याच जोशात प्रमोशन करत आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावर मजेशीर रील करताना देखील ते दिसत आहेत. या चित्रपटाच्या कास्टिंग विषयी बोलायचे झाले तर अक्षय आणि टायगर शिवाय या चित्रपटात मानुषी छिल्लर आणि अलाय एफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *