Headlines

‘द वॅक्सीन वॉर’च्या शूटिंगचा तो सीन अन्… संपूर्ण टीम झाली भावूक

[ad_1]

The Vaccine War : जागतिक स्तरावर कोविड-19 चा प्रभाव गंभीर आहे आणि उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न केले गेले. कोव्हिड काळात भारतात, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, AIIMS आणि भारत बायोटेकसह विविध संस्थांनी एक उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन करण्यासाठी सहकार्य केले. दोघांनी मिळून विशेषतः भारतासाठी किंबहुना संपूर्ण जगासाठी covid आजारासावर एक लस विकसित केली. भारताच्या COVID-19 लसीकरणाच्या प्रयत्नांची कथा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि पल्लवी जोशी आणि ‘The vaccine war’ या चित्रपटाद्वारे  सादर केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचं उत्तम प्रतिसाद मिळल; मात्र लवकरच हा चित्रपट डिस्ने+हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

कोव्हिड महामारीदरम्यान प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अनेकानेक आव्हानांना तोंड देत होता द व्हॅक्सिन वॉरच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटातील अशाच एका दृश्यबद्दल सांगताना म्हणाले, ‘चित्रपटात एक अतिशय कठीण सीन होता जिथे डॉ. व्हेजिटा 21 दिवसांनी घरी परतत असते. मात्र, एका इमर्जन्सी कॉलमुळे तिला परत जावं लागतं. त्याचवेळेला आईच्या अनुपस्थितीमुळे तिच्या मुलाला प्रचण्ड मानसिक त्रास होत आहे आणि तो तिच्या पाया पडून ‘नको जाऊ’ अशा विनवण्या करत असतो. पण तरीसुद्धा तिला आपल्या मुलाला सोडून जावं लागतं. असा विचित्र अनुभव सहन करणाऱ्या मुलाची ही सत्य कथा आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आईच्या बलिदानाचा हा सीन शूट करताना संपूर्ण युनिट देखील भावुक झालं होतं.

हेही वाचा : Feminism वरुन ट्रोल करणाऱ्याला नीना गुप्ता यांचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘जर तुम्ही नशेत…’

तुम्ही हा चित्रपट ‘डिस्ने+हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅट फॉर्मवर पाहू शकता. त्यामुळे जर अजूनही तुम्हाला हा चित्रपट पाहाण्याचा वेळ मिळाला नसेल तर नक्की विकेंडला घरी बसल्या बसल्या ओटीटीवर पाहू शकता. जरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली नसेल. तरी कलाकारांच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जगभरात या चित्रपटाची स्तुती करण्यात येत आहे. या चित्रपटात कोव्हिडमध्ये जगभरात झालेली परिस्थिती थोडक्यात दाखवली आहे. या चित्रपटाची निर्मिती ही पल्लवी जोशीनं केली आहे. तर विवेक अग्निहोत्रीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या आधी त्यांनी विवेक अग्निहोत्री यांनी द कश्मीर फाइल्स चित्रपट दिग्दर्शित केला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *