Headlines

टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे थेट संजय राऊतांच्या निवासस्थानी | rashmi thackeray meets sanjay raut family man navratri

[ad_1]

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले. रशी ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचेही दर्शन घेतले. शिवसेनेतील बंडानंतर रश्मी ठाकरे यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या या कृतीचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. नवरात्रोत्सवातील सहभागासोबतच आज (२९ सप्टेंबर) रश्मी ठाकरे यांनी सध्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीसाठी त्या थेट राऊत यांच्या निवासस्थानी गेल्या.

हेही वाचा >>> “भाजपाकडून पंकजा मुंडेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न”, मुंडेंच्या ‘बेरोजगार’ विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी जात राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राऊत यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांनी नवरात्रोत्सव साजरा केला. संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे या त्यांच्या घरी दाखल झाल्या. याच कारणामुळे रश्मी ठाकरेंच्या या भेटीला विशेष महत्त्व आले आहे. संजय राऊत हे सध्या कारागृहात असताना अशा कठीण प्रसंगात ठाकरे कुटुंबीय राऊत यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना दिला.

हेही वाचा >>> बाळासाहेबांचा आवाज, हिंदवी तोफ अन्…; CM शिंदेंनी शेअर केला स्वत:चा ‘एकलव्य’ असा उल्लेख ‘शिवसेना दसरा मेळाव्याचा’ टीझर

याआधी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर ठाकरे गटाकडून देवीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या उत्सवाला उपस्थिती लावण्याआधी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *